Manoj Jarange : "फडणवीसलाच जेलमध्ये टाकावं लागेल", जरांगेंची स्फोटकं विधानं
Manoj Jarange reply to devendra fadnavis : मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना काही सवाल करत एसआयटी चौकशीबद्दल भूमिका मांडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मनोज जरांगे पाटील संतापले

एसआयटी चौकशीबद्दल बोलताना जरांगे काय म्हणाले?

जरांगेंचा पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा?
Manoj Jarange On SIT Inquiry : (इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर) मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत (२७ फेब्रुवारी) केली. यावर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. जरांगे यांनी फडणवीस यांना काही सवाल केले. जरांगे काय म्हणाले वाचा...
मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
"मी आधीच सांगितलं आहे की, हे षडयंत्र रचायला लागेलत, मला गुंतवण्यासाठी. तसे लोक यांनी तयार करून मुंबईत नेऊन बसवले आहेत. हेही मी आधीच मराठा समाजाला सांगितलं आहे. त्यापेक्षा सरळ सांगितलं की, तू (देवेंद्र फडणवीस) इकडे काय षडयंत्र करतो, मीच तुझ्या घरी येतो", असं जरांगे म्हणाले आहेत.
हेही वाचा >> जरांगेंची एसआयटी चौकशी करणार; फडणवीसांनी विधानसभेत काय सांगितलं?
"हे मला गुंतवणारचं होते, कारण मराठा समाज यांच्या पूर्णविरोधात गेलेला आहे आरक्षणासाठी. स्वतःच्या लेकरासाठी मराठे विरोधात जाणार नाही, तर तुझ्यासाठी जातील का? आम्ही ७० वर्षे घातली ना. एवढा निष्ठावान आंदोलक यांना भेटला नव्हता म्हणून ही सगळी टोळी एक झाली", असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला.
तुझ्या बाजूने फक्त नेते आहेत -जरांगे
जरांगे पुढे म्हणाले, "हे म्हणताहेत सगळा मराठा समाज माझ्या बाजूने आहे, कुणी नाही तुझ्या (फडणवीस) बाजूने फक्त नेते आहेत. मराठ्यांनो, यंत्रणेचा दुरुपयोग करून मला गुंतवणार आहेत. पण, मी भीतच नाही. चौकशीला बोलवल्यावर लोक दवाखान्यात जातात, मला बोलवलं तर मी सरळ जाईन. तू कितीही डाव रच... तुला कितीही एसआयट्या रचायच्या काय करायचं ते कर."