Manoj jarange : 'मला अटक होणार', जरांगेंच्या दाव्याने खळबळ
Manoj Jarange Sensational claim : मला एसआयटी चौकशी सुरू आहे की नाही, हे देखील माहित नाही. यांच काय चाललंय याचा काहीच मेळ नाही. आणि माझ्याकडे कुणीच येईना म्हणून मीच बाहेर पडलोय. तसेच चौकशीत अडचणी येऊ नये मी पटकन आलो असल्याचे जरांगेंनी सांगितले.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Sensational claim : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची चौकशी करण्यासाठी सरकारने एसआयटी (SIT) गठीत केली होती. या एसआयटीचा अहवाल आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. या चौकशीवर बोलताना ''सत्तेत मी काटा आहे. मला अटक होण्याची शक्यता आहे. त्याबाबत अहवाल देखील तयार करण्यात आला आहे,'' असा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) केला आहे. maratha reservation i will be arrested manoj jarange sensational claim beed rally cm eknath shide
ADVERTISEMENT
मनोज जरांगे पाटील बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जरांगेंनी अटक होण्याची शक्यता असल्याचा दावा केला होती. यावेळी जरांगे पाटील एसआयटी चौकशीवर म्हणाले की, मला एसआयटी चौकशी सुरू आहे की नाही, हे देखील माहित नाही. यांच काय चाललंय याचा काहीच मेळ नाही. आणि माझ्याकडे कुणीच येईना म्हणून मीच बाहेर पडलोय. तसेच चौकशीत अडचणी येऊ नये मी पटकन आलो असल्याचे जरांगेंनी सांगितले.
हे ही वाचा : कार्यकर्त्याच्या 'त्या' एका कृतीमुळे मोदी झाले भावूक, जुळ्या बाळांच्या बापासाठी पंतप्रधानांची पोस्ट
दरम्यान चौकशीचा अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे, म्हणजेच तयारच झाला आहे. तसेच मला त्यांच्या खूप खात्रिलायक माणसाने सांगितलं होतं की, चौकशीचा अहवाल तयार झाला आहे आणि तुम्हाला अटक करणार आहेत. तुम्ही सत्तेच्या मध्ये काटा आहात, तो काढल्याशिवाय पर्याय नाही, नाहितर 10 टक्के आरक्षण यांच्यावर थोपवा, नाहितर याला गुंतवा, अशी चर्चा सुरू असल्याची माहिती जरांगेंनी दिली. मला त्यादिवशी कळालं होत हे असे करणार आहेत म्हणून मी सागर बंगल्यावरती चाललो होतो,असे जरांगे
पाटलांनी सांगितले.
हे वाचलं का?
हे ही वाचा : निलेश लंकेंना कोल्हेंची खुली ऑफर; शरद पवारांकडून लोकसभा लढवणार?
मराठा समाजाला सरकारने 10 टक्के आरक्षण दिले आहे. पण ठराविक लोकांनाच माहिती आहे, हे आरक्षण टिकणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही खोट बोला आणि टीकणार आहे असे सांगा आणि ते स्विकारा.गुलाल उधळा म्हणजे पुन्हा एकदा मराठे मग त्यांना सत्तेत आणणार. पुन्हा ते आमचे मुंडके मोडायला चालू करतील. म्हणून मराठ्यांवर गुन्हे दाखल करून दबाव टाकला जात असल्याचा आरोप जरांगेंनी यावेळी केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT