महाराष्ट्र शोकसागरात तर दुसरीकडे ‘राज’पुत्र अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी डीजे, 350 किलोचा हार

मुंबई तक

ADVERTISEMENT

irshalwadi tragedy on other side dj 350 kg necklace welcome raj thackeray son amit thackeray jalgaon
irshalwadi tragedy on other side dj 350 kg necklace welcome raj thackeray son amit thackeray jalgaon
social share
google news

मनीष जोग, जळगाव: रायगड (Raigad) जिल्ह्यातील इर्शाळगड येथील इर्शाळवाडीवर (irshalwadi tragedy)डोंगर कोसळून मोठी जीवितहानी झाली आहे. या घटनेने अवघा महाराष्ट्र हा शोकसागरात बुडला आहे. मात्र, असं असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे मात्र, आपल्या स्वागत समारंभात व्यस्त दिसले. महासंपर्क अभियानांतर्गत अमित ठाकरे हे आज (20 जुलै) जळगावमध्ये (Jalgaon) पोहचले. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचे अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तब्बल 300 किलो फुलांचा हार आणि डीजेच्या गोंगाटात हा सगळा स्वागत सोहळा पार पडला. एकीकडे इर्शाळवाडीची घटना घडलेली असताना दुसरीकडे असा स्वागत सोहळा करणं योग्य नसल्याच्या भावना अनेक सामान्य नागरिक आता व्यक्त करत आहेत. (mourning across maharashtra irshalwadi tragedy on other side dj 350 kg necklace welcome raj thackeray son amit thackeray jalgaon)

ADVERTISEMENT

जळगावात डिजेच्या तालावर अमित ठाकरेंचं स्वागत

महासंपर्क अभियानांतर्गत मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. खान्देशात दाखल होऊन नंदुरबार, धुळ्याचा दौरा करून अमित ठाकरे हे आज दुपारी जळगाव शहरात दाखल झाले. यावेळी जळगावच्या आकाशवाणी चौकात त्यांचं डीजेच्या तालात साडेतीन क्विंटलचा झेंडूच्या फुलांचा हार घालून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विजयी घोषणा देत यावेळी आकाशवाणी चौकाचा परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला.

हे ही वाचा >> Kalyan: नाल्यात वाहून गेलेल्या ‘त्या’ बाळाचं नेमकं काय झालं?, 24 तास उलटले तरीही…

खरं तर अशा प्रसंगी राजकीय नेत्यांनी संयमीपणा दाखवून कार्यकर्त्यांनी त्यांचा उत्साहीपणा दाखवू नये यासाठी समज देणं आवश्यक असतं. मात्र, जळगावमध्ये तसं काहीही घडल्याचं दिसून न आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे वाचलं का?

इर्शाळवाडीच्या घटनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

दरम्यान, इर्शाळवाडीच्या या दुर्घटनेवर राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका व्यक्ती केली.

‘रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं. खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा.’ अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी यावेळी दिली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्र्यांच्या अभिष्टचिंतनाचा आयोजित कार्यक्रम रद्द

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिष्टचिंतनाचा आज, गुरुवार, दि. 20 जुलै 2023 रोजी, हॉटेल ताज पॅलेस, कुलाबा येथे आयोजित करण्यात आलेला अभिष्टचिंतन व स्नेहभोजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक इर्शाळगड परिसरात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. पण यंदा इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

आदित्य ठाकरे इर्शाळवाडीला पोहचले..

दुसरीकडे शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांनी मात्र, आजच इर्शाळवाडीला जात संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. याशिवाय तेथील पीडित कुटुंबीयांचं सांत्वन करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला.

हे ही वाचा >> Irshalwadi Landslide : निसर्गासमोर टेकले हात! जिथे झाला मृत्यू, तिथेच होणार अंत्यसंस्कार, कारण…

यावेळी आपण कोणतेही राजकीय प्रश्न सरकारला सध्या तरी विचारणार नाही. कारण आताचा घडीला नागरिकांचा जीव बचावणं गरजेचं असून त्यासाठी योग्य ती मदत मिळणं गरजेचं आहे. अशी सामंजस्याची भूमिका आदित्य ठाकरेंनी यावेळी घेतली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT