Mumbai : महिलेला 16 महिन्यात पाच वेळा हार्ट अटॅक तरीही जिवंत, डॉक्टरही अवाक्

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mulund women got five time heart attack but still survive doctors also surprise mumbai story
mulund women got five time heart attack but still survive doctors also surprise mumbai story
social share
google news

Mulund women got five time heart attack : मुलूंडमध्ये एका महिलेला गेल्या 16 महिन्यात 5 वेळा हदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. या घटने दरम्यान तिच्या शरीरात पाच वेळा स्टेंट (Stent) टाकण्यात आले. 6 वेळा तिची अ‍ॅजिओप्लास्टी (Angioplasty) आणि एक वेळ तिची कार्डियक बायपास सर्जरी (bypass Surgery) झाली. इतकं सगळ होऊन सुद्धा महिला जिवित आहे आणि तिला आता तिच्या प्रकृतीची चिंता सतावतेय. विशेष म्हणजे डॉक्टर देखील अशाप्रकारचं प्रकरण पाहून चकीत झाले आहेत. (mulund women got five time heart attack but still survive doctors also surprise mumbai story)

ADVERTISEMENT

द टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सुनीता (नाव बदलले) यांना पहिला हदय विकाराचा झटका हा सप्टेंबर 2022 दरम्यान आला होता. यावेळी त्या जयपूर ते बोरीवली असा ट्रेनने प्रवास करत होत्या. या प्रवासा दरम्यानच त्यांना हदय विकाराचा झटका आला होता. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना अहमदाबादच्या सार्वजनिक रूग्णालयात दाखल केले होते. यावेळी हदयरोग तज्ञ डॉ. हसमूख रावत यांनी त्यांच्या दोन अ‍ॅजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी केली होती.

हे ही वाचा : Pneumonia Outbreak : कोरोनानंतर चीनमध्ये नव्या आजाराचा उद्रेक! दिल्लीतही आढळले 7 रूग्ण!

रेखाच्या हदयाच्या समस्येमागील कारण एक रहस्यचं बनले आहे. तज्ञानुसार, व्हॅस्क्युलायटीस सारख्या ऑटो इम्यून हे या आजाराचे कारण असू शकते. ज्यामध्ये रक्तवाहिन्यांना सूज येते आणि रक्त वाहण्याचा रस्ता अरूंद होतो. पण सुनीताच्या बाबतीत यातले कुठलेच निदान झाले नाही आहे. त्यामुळे सुनीताची हदयाशी संबंधीत समस्या रहस्य बनली आहे.

हे वाचलं का?

सूनीतामध्ये दर काही महिन्यांनी हदयविकाराची कारणे स्पष्ट दिसतात. ज्यामध्ये तीव्र छातीत दुखणे, ढेकर येणे आणि अस्वस्थता यांचा समावेश असतो. यावर सुनीताने सांगितले की, फेब्रुवारी, मे, जुलै आणि नोव्हेंबर महिन्यात हदय विकाराचा झटका आला आहे. तसेच सुनीताला डायबिटीज, हाय कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा सारखे आजार देखील आहेत.

सप्टेंबर 2022 मध्ये त्यांचे वजन 107 किलो होते. आता त्यांचे वजन 30 किलोपेक्षा कमी झाले आहे. त्यांना कोलेस्टेरॉल कमी करणारी पीसीएसके9 इनहिबिटर इंजेक्शनही देण्यात आले आहे. ज्यामुळे त्यांचे कोलेस्टेरॉल ही कमी झाले आणि डायबिटीजही नियंत्रणात आले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Nawab Malik : अजित पवारांचा कॉल, शरद पवारांना धक्का; मलिक महायुती बरोबर?

दरम्यान रुग्णांच्या एकाच ठिकाणी ब्लॉकेजेस निर्माण होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण सुनीताच्या केसमध्ये तिला वेगवेगळ्या ठिकाणी ब्लॉकेजेस येत आहेत, असे डॉ. हसमुख रावत यांनी सांगितले. सुनीता यांना पहिला हदय विकाराचा झटका हा डाव्या धमनीत 90 टक्के ब्लॉकेजमुळे आला होता. तर दुसरा झटका हा उजव्या धमनीत 99 टक्के ब्लॉकेजमुळे आला होता. मेडीकलदृष्ट्या सांगायच झालं तर, सुनीता नशिबवान ठरल्या आहेत.. कारण तिला हृदयविकाराचा झटका NSTEMI किंवा नॉन-एसटी-एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन होता जो हृदयाच्या ऑक्सिजनच्या गरजा पूर्ण न झाल्यास येतो. STEMI हृदयविकाराचा झटका NSTEMI पेक्षा जास्त धोकादायक आहे, असे डॉ. रावत यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

केईएम रुग्णालयाचे कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अजय महाजन सांगतात, असे ‘घातक एथेरोस्क्लेरोसिस (धमन्यांचे कडक होणे)’ दुर्मिळ आहे. डॉक्टरांनी तिचे लिपिडस अनेक महिन्यांपासून कमी ठेवले आहेत. तिचे स्टेंटींग आणि बायपास केली आहे, तरी देखील तिला हिच समस्या उद्भवतेय.म्हणून ही एक दुर्मिळ ऑटो इम्युन स्थिती अशी शकते, असे महाजन म्हणतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT