Mumbai Hit and Run : BMW कारने दोन गणेशभक्तांना उडवलं, हिट अँड रनने मुंबई पुन्हा हादरली!
Mumbai Mulund Hit and Run : मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे दोन मंडळाचे कार्यकर्ते पहाटे 4 वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवर जवळ बॅनर लावत होते. या दरम्यान अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेल कडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असताना ती या तरूणांचा भीषण धडक दिली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना बीएमडबल्यू कारने उडवलं
पहाटे 4 च्या सूमारास मुलुंडमध्ये ही घटना घडली
एकाचा मृत्यू तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर
Mumbai Mulund Hit and Run : एजाज खान, मुंबई : मुंबई पुन्हा एकदा हिट अॅड रनच्या घटनेने हादरली आहे. गणेश चतुर्थीची तयारी करणाऱ्या मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना बीएमडबल्यू कारने उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत मंडळाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा कार्यकर्ता हा गंभीररीत्या जखमी आहे. या घटनेनंतर बीएमडबल्यू कारचालक फरार झाला आहे. पोलिसांनी या बीएमडब्ल्यू कारचालकाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. मुलुंडमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त होतं आहे. (mumbai accident mulund hit and run bmw car hit two people mulund cha raja mandal worker gavhanpada area accident story)
मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे दोन मंडळाचे कार्यकर्ते पहाटे 4 वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवर जवळ बॅनर लावत होते. या दरम्यान अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेल कडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असताना ती या तरूणांचा भीषण धडक दिली.
हे ही वाचा : Manoj Jarange : महायुतीची डोकेदुखी वाढणार, विधानसभेसाठी जरांगेंचा प्लॅन काय?
मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवर जवळ बॅनरजवळ गणेश मंडळाचे दोन कार्यकर्ते सकाळच्या सुमारास बॅनर लावत होते. यावेळी एक बीएमडबल्यू कार वेगाने आली अन् तिने प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील यांना उडवल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये प्रीतम थोरात याचा जागीच मृत्यू झाला आहे, तर प्रसाद पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्याच्यावर उपचार सूरू आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
या घटनेनंतर तत्काळ घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून कार आणि चालकाचा शोध सुरू केला आहे. ही पहाटे चारच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसेच कार चालकारचा शोध घेण्यासाठी 8 टीम नेमल्या आहेत. तसेच पोलिसांनी गाडीचा शोध घेतला आहे आणि ते लवकरच आरोपी कारचालकाचा शोध घेतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस याप्रकरणात अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT