Manoj Jarange : महायुतीची डोकेदुखी वाढणार, विधानसभेसाठी जरांगेंचा प्लॅन काय?
Maharashtra Assembly Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला (Mahayuti) टफफाईन देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. मात्र ते निवडणूकीच्या मैदानात उतरणार की थेट उमेदवारांना पाडणार? की कुणाला पाठिंबा जाहीर करणार? असे अनेक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे नेमकी काय आहेत? ती या बातमीतून जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
जरांगे पाटलांनी विधानसभेसाठी कंबर कसली
निवडणुकीच्या मैदानात उतरणार का?
थेट उमेदवारांना पाडणार?
Maharashtra Assembly Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला (Mahayuti) टफफाईन देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. मात्र ते निवडणूकीच्या मैदानात उतरणार की थेट उमेदवारांना पाडणार? की कुणाला पाठिंबा जाहीर करणार? असे अनेक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे नेमकी काय आहेत? ती या बातमीतून जाणून घेऊयात आणि जरांगेंचा नेमका विधानसभेचा प्लॅन काय आहे? ते वाचूयात. (maharashtra assembly election manoj jarange patil vidhan sabha election strategey mahayuti vs maha vikas aghadi eknath shinde devendra fadnavis udhhav thackeray sharad pawar maratha factor maharashtra politics)
ADVERTISEMENT
अंतरवाली सराटी नावाचं एक गाव. एक व्यक्ती जो सातत्यानं काही वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठवाड्यात आंदोलन करत असतो. शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी अचानक दगडफेक आणि लाठीचार्ज होतो आणि चर्चेत नसणारं हे आंदोलन राज्यभर आणि पुढे चालून देशभर गाजतं आणि मनोज जरांगे पाटील नावाचा व्यक्ती चर्चेत येतो. आधी लोकसभेला जरांगे फॅक्टरचा दणका काही नेत्यांना आणि पक्षांना बसतो आता विधानसभेला देखील हा फॅक्टर अनेकांना धडकी भरवतोय. जरांगे पाटलांचं आता जवळपास ठरलंय. विधानसभेला त्यांची तयारी जोरदार सुरु झालीय. ही तयारी कशी आहे आणि विधानसभेला मराठा फॅक्टर कसा चालणार आणि जरांगेंमुळं कुणाला फायदा आणि कुणाला झटका बसणार याबाबतच पुढील काही मिनिटात आपण जाणून घेऊयात.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, सरकारने घेतला 'हा' निर्णय
लोकसभेला कुणाला पाडायचं हे तुम्ही ठरवा म्हणणारे जरांगे पाटील आता थेट काहींची नावं घेत पाडायचं सांगू लागलेत. फडणवीस, भुजबळ, मुंडे, दरेकर, राणे, लाड, दानवे, वडेट्टीवार, महाजनांसह अनेक नेत्यांना थेट नाव घेत जरांगेंनी अंगावर घेतलंय. लोकसभेला त्यांची जी लाईन होती त्यामध्ये आणि आता विधानसभेच्या आधीची त्यांची लाईन यात बराच फरक जाणवत आहे. मराठा आरक्षणाची त्यांची सुरुवातीची मागणी ते आताची भूमिका यात देखील बराचसा फरक झालाय किंवा त्यांच्या मागण्या वाढत गेल्याचं सुद्धा आपण पाहिलं. आंदोलनाला धार येताच त्यांनी सरकारला अडचणीत आणायला सुरुवात केली. मराठा आरक्षण ओबीसीतून द्या, नंतर सगेसोयरे, त्यानंतर सरसकट अशी मागणी जरांगेंनी केली. यानंतर त्यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांना मदत देण्याची मागणी देखील लावून धरली.
हे वाचलं का?
आधी फक्त मराठा आंदोलनाच्या अवतीभवती असणारे जरांगे पाटील हळूहळू इतर मुद्द्यांवरही बोलू लागले. अगदी बांगलादेशच्या अस्थिरतेबाबच्या आंतराष्ट्रीय प्रश्नांवर सुद्धा त्यांची स्टेटमेंट्स येऊ लागली. सध्याचे त्यांची विधाने बघता ते अगदी राजकीय नेत्यांप्रमाणं कुठल्याही मुद्द्यांवर धडाधड बोलताना दिसताहेत. मराठवाड्यात पावसानं हाहाकार केला. यानंतर जरांगे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. तिथं जाऊन त्यांनी आधी धनंजय मुंडेंना फोन करुन सरसकट मदतीचं आश्वासन घेतलं शिवाय सरकारला इशाराही दिला. नंतर त्यांनी रोज ज्यांच्यावर टीका करतात अशा फडणवीसांनाही बोलून घेतलं.
शेतकऱ्यांच्या विषयाच्या माध्यमातून चर्चेची दारं उघडी केली. एखाद्या मातब्बर नेत्यासारखं त्यांनी विधानसभेला इच्छुकांचे अर्ज मागवलेत. बरं त्यांनी आवाहन केल्यानंतर अशा अर्जदारांनी लाईन लावलीय, आणि अर्जांचा पाऊस पडलाय. आपण जर पाहिलं तर जरांगे पाटील हे आधी फक्त आरक्षणावर केंद्रीत होते. मराठा समाजाला आरक्षण हाच त्यांचा फोकस होता, जो त्यांनी ढळू दिलेला नव्हता. आता मात्र ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पोटतिडकीने बोलू लागलेत. मुलांच्या नोकरीचे प्रश्न असतील अॅडमिशनच्या समस्या असतील यावर देखील जरांगे भाष्य करत आहेत. ''वीज द्या, मराठवाड्याला आणि विदर्भाला पाणी द्या'', असं देखील जरांगे बोलू लागलेत. लाडक्या बहिणीला पैसे भेटले पण दाजीचं काय? सगळे दाजी आणि भाचे घेऊन तिकडे येणार आहे, असं म्हणत ते सरकारला चिमटे घेऊ लागलेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Gold Price: बाप्पाच पावला! गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोन्याचे दर कोसळले; पाहा आजचा 24 कॅरेटचा भाव...
शेतकऱ्यांना मदतीसह हमीभाव, रोजगार, शिक्षण या मुद्द्यांवरही ते सातत्यानं बोलत असता. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ते मालवणलाही जाऊन आले. शिवाय एसटी आंदोलनावरही जरांगेंनी परखड भूमिका घेतली. एसटी कर्मचाऱ्यांचे हाल देवेंद्र फडणवीस यांनी पाठीमागच्या सरकार पासून चालवले असल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली. सर्वांची सेवा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार का वाढू नये? असा सवाल करत एसटी कर्मचाऱ्यांचा संसार डुबवून सरकार स्वतःचा संसार मोठा करू लागलाय अशी सडेतोड टीका जरांगेंनी केलीय.
ADVERTISEMENT
मराठ्यांनी व्यसनापासून लांब जावे, असं जरांगे वारंवार सांगत असतात. शिवाय आपल्या अधिकाऱ्यांना प्रचंड त्रास दिला जातो, आपल्या अधिकाऱ्याला त्रास झाल्यास त्यांच्या मागे समाजाने उभा राहण्याची गरज आहे, असं म्हणत अधिकाऱ्यांच्या लॉबीला देखील जरांगेंनी खूश करण्याचा प्रयत्न केलाय. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये देखील मला जायचे आहे पण माझा आणि हिंदीचा मेळ बसत नाही असं त्यांनी म्हटलंय. याचा अर्थ महाराष्ट्राच्या बाहेर कक्षा रुंद करण्याच प्रयत्न देखील जरांगे करत आहेत.
आता मी ज्याला पाडायचे आहे, त्याचे नाव घेणार आहे. 48 मतदार संघात सगळे राखीव आपल्या विचाराचे काढा, असं सुद्धा जरांगेंनी सांगितलंय. उभा करायचे की पाडायचे याची तारीख निवडणुकीच्या आधी सांगणार आहे. ताकदीने पाडलं तस आपला मराठा निवडून आणण्यासाठी ताकद दाखवा, असं ठासून ते सांगत आहेत.
संभाजीनगरच्या पैठणमध्ये जरांगे पाटलांनी जनसंपर्क कार्यालय सुरु केलंय. पैठण हा मराठाबहुल मतदारसंघ आहे. त्यामुळं जर समजा जरांगे स्वता मैदानात उतरले तर त्यांना जिंकण्यासाठी जास्त अडचण येणार नाही, असं बोललं जातंय. ज्या गोदापट्ट्याचा जरांगे वारंवार उल्लेख करत असतात त्या पट्ट्याचं मूळ असलेल्या पैठणमध्ये कार्यालय सुरु करुन जरांगे काय संदेश देताहेत? हे देखील चर्चेचा विषय ठरत आहे. उमेदवारांची शोधमोहिम सुरु असताना स्वत: मैदानात उतरण्याच्या त्यांच्या तयारीवर यामुळं जोरदार चर्चा होतेय.
लोकसभेला जरांगेंचं आंदोलन आणि मराठा फॅक्टर जोरात चालल्याचं बोललं जातंय, त्यामुळं आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांच्याकडं गांभीर्यानं पाहिलं जातंय. जरांगेंनी तसा मार्ग देखील खुला केलाय. विधानसभेसाठी इच्छुकांच्या निवेदनांचे गठ्ठे अंतरवालीत येऊन पडलेत. विधानसभेला लोकसभेप्रमाणं फक्त पाडायचं की लढायचं याबाबत जरांगे आता काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणाची स्थिती आपल्याला माहितीच आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसह मनसे, वंचित आणि इतर प्रमुख अपक्षांकडून भरमसाट इच्छुकांची गर्दी झालीय. त्यामुळं अनेक दांडग्या, दिग्गजांसह काही इच्छुकांनी जरांगेंच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळं लोकसभेला जरांगेंमुळं झालेलं डॅमेज पाहता विधानसभेला जर त्यांनी स्वताचे काही उमेदवार निवडून आणलेच तर जरांगेंचा रोल महत्त्वाचा होऊ शकतो असं ज्येष्ठ विश्लेषक सांगत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT