Mumbai Rain Alert : महाराष्ट्राला झोडपणार! मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Weather Alert Today : राज्यातील काही भागात आजही पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाने मुंबई, पुण्यासह कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (IMD issued Alert For Maharahstra, Mumbai, pune and vidarbha)
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात पावसाची संततधार कायम असून, आज राज्यातील काही भागात अतिवृष्टीसदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टी, विदर्भातील काही जिल्हे आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह इतर काही भागात 28 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
वाचा >> ‘एनडीए अमिबा, मोदींची जेवणावळ’; INDIA च्या स्थापनेनंतर उद्धव ठाकरेंचा पहिला हल्ला
Coastal #Maharashtra and #Goa bracing for heavy to very heavy rainfall, with extremely heavy downpours forecasted on 25th and 26th July.
Stay safe!#HeavyRainfall #WeatherUpdate #monsoon2023 #monsoonseason@moesgoi@DDNewslive@ndmaindia@airnewsalerts pic.twitter.com/Rw7swTclML
— India Meteorological Department (@Indiametdept) July 25, 2023
हे वाचलं का?
26 जुलै : कोकणात अतिमुसळधार, विदर्भालाही झोडपणार
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल. आयएमडीने रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.
वाचा >> Viral News: बॉयफ्रेंडने प्रपोज केल्यानंतर गर्लफ्रेंड थेट 100 फूट खोल दरीत पडली!
मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
वाचा >> Pune Crime : ‘तुलाही गोळी घालेन’, पत्नी-पुतण्याच्या हत्येपूर्वी काय घडलं?
मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र 204.4 मिली मीटर इतका पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. यामुळे काही भागात पूरपरिस्थिती उद्भवू शकते. त्याचबरोबर नागरिकांनी पाणी भरणाऱ्या ठिकाणांपासून लांब राहावं आणि संवेदनशील ठिकाणी जाऊ नये, असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT