Maharashtra weather alert : आभाळ फाटणार! मुंबई-पुण्यासह 6 जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra, mumbai, pune, Raigad weather alert : गेल्या काही तासांपासून मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पुर परिस्थिती उद्भवली असून, मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, रायगडसह राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. हवामान विभागाने विभागाने काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पुन्हा एकदा आभाळ फुटल्याचीच स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बंगालचा उपसागर आणि आडिशाच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने विभागनिहाय इशाराही दिला आहेत.
20 जुलै : मुंबई-पुण्यात अतिमुसळधार
हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे कोकण, मुंबई, ठाणे, पुणे, पालघर या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
वाचा >> IrshalWadi Landslide : ‘माझे तर सगळेच मेले’, वन विभागामुळे इर्शाळवाडी गेली मृत्यूच्या जबड्यात!
त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे.