Nashik Accident : नाशिकच्या 5 भाविकांवर काळाचा घाला, कार-कटेंनरच्या भीषण अपघताात मृत्यू

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

nashik accident news Swift car and container accident five people dies nashik manmad yeola highway accident
nashik accident news Swift car and container accident five people dies nashik manmad yeola highway accident
social share
google news

Nashik Accident News : नाशिकच्या (Nashik) मनमाडमधून (Manmad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत स्विफ्ट कार (Swift Car) आणि कटेंनरची (Container) समोरासमोर भीषण धडक झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच तरूणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारचा अक्षरश चक्काचुर झाला आहे. मनमाडजवळील अनकवडे रेल्वे उड्डाणपुलावर हा अपघात घडला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. (nashik accident news Swift car and container accident five people dies nashik manmad yeola highway accident)

मिळालेल्या माहितीनुसार, रस्ते अपघातात मृत पावलेले हे पाचही तरूण मुळचे नाशिकचे होते. नाशिकहून हे तरूण मनमाडजवळील कुंडलगाव येथील म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून येवला मार्गे नाशिकला परतत असताना अनकवडे रेल्वे उड्डाणपुलावर त्यांच्या स्विफ्ट कारची कंटेनरला भीषण धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की यात कारचा अक्षरश चक्काचूर झाला.

हे ही वाचा : Hardik Pandya IPL: मुंबई इंडियन्सकडे नव्हते पैसे, ‘हा’ खेळाडू देऊन हार्दिकला घेतलं विकत

या भीषण अपघातात कारमधील पाचही तरूणाचा जागीच मृत्यू झाला. रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतीक नाईक अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे असून पाचही तरुण नाशिकचे रहिवासी आहेत. रविवारी मध्यरात्री रस्त्याच्या मधोमध ही अपघाताची घटना घडल्यामुळे मार्गावर वाहतूक संथगतीने सुरू होती. तसेच खराब हवामान, पाऊस आणि रात्री अंधारामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. दरम्यान तरूणांचे मृतदेह मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. या अपघाताने नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होते आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवेळी पावसाचे आगमन झाले आहे. या पावसामुळे आणि खराब वातावरणामुळे महार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक महामार्गावरील तर विद्यूत यंत्रणाच खंडीत झाल्याने अपघाताच्या घटना घडतायत.

हे ही वाचा : IPL 2024 Retention: आयपीएलच्या फ्रँचाइजींनी कोणत्या खेळाडूंना केले रिटेन आणि रिलीज? संघाची संपूर्ण यादी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT