Viral Video: महिलेला खांद्यावर घेऊन धावतच सुटली...', महिला पोलिसाचा 'तो' Video नेमका काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

nashik police cop rescues unconscious women by carrying her on her shoulders video viral nashik adivasi morcha pesa meeting tribal protest
नाशिक पोलीस दलातील एका महिला पोलिसाने एका महिलेचे प्राण वाचवले आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आंदोलक महिलेला खांद्यावर उचलून केली मदत

point

बेशुद्ध पडलेला महिलेला पोलीस व्हॅनपर्यंत पोहोचवलं

point

महिला पोलिसाच्या कामगिरीचे सर्व६

Nashik Police Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात, काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही खूपच आश्चर्यचकीत करणारे असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत नाशिक पोलीस (Nashik Police) दलातील एका महिला पोलिसाने (women Constable) एका महिलेचे प्राण वाचवले आहे. तिच्या कामगिरीचे आता संपूर्ण शहरभर कौतुक होत आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. (nashik police cop rescues unconscious women by carrying her on her shoulders video viral nashik adivasi morcha pesa meeting tribal protest)

ADVERTISEMENT

व्हायरल व्हिडिओत काय? 

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक महिला बेशुद्ध झालेली दिसते आहे. या महिलेला दोन महिला पोलिसांनी पकडून धरले आहे. त्यातल्या एका महिलेने बेशुद्ध झालेल्या महिलेला खांद्यावर उचलले आहे. त्यानंतर ती महिला पोलीस खांद्यावरून त्या  महिलेला पोलीस व्हॅनपर्यंत नेते. त्यानंतर पोलीस व्हॅनमध्ये बसलेल्या इतर महिला कॉन्स्टेबल तिला व्हॅनमध्ये नेतात, असे व्हिडिओ दाखवण्यात आले आहे.  त्यामुळे महिलेला शुद्धीवर आणण्यासाठी तिला कदाचित रूग्णालयात नेल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा : Shivaji Maharaj Statue: शिंदे सरकारचं डॅमेज कंट्रोल सुरू, 'वर्षा'वरच्या 'त्या' बैठकीतील Inside स्टोरी

दरम्यान महिला पोलीस कर्तव्य बजावत असताना एकाने त्यांचा हा व्हिडिओ कॅमेरात कैद केला होता. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून आता महिला पोलिसावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. 

हे वाचलं का?

त्याचं झालं असं की पेसा क्षेत्रातील उपोषणार्थींना पाठींबा देण्यासाठी बुधवारी आदिवासी विकास भवनासमोर नाशिक जिल्ह्यासह राज्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांनी आदिवासी विकास भवनवर भव्य मोर्चा काढला होता. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देऊन परिसर दणाणून सोडला होता. 

हे ही वाचा : Gold Price Today: बापरे! सणासुदीला सोन्याच्या किंमतीत भडका; आज 1 तोळ्याची किंमत किती?

आदिवासी बांधवांच्या या ठिय्या आंदोलना दरम्यान एका महिलेची अचानक प्रकृती बिघडली होती. यावेळी घटनास्थळी कर्तव्यावर असलेल्या मनिषा सोनावणे यांनी क्षणाचाही विलंब न लावता महिलेला खांद्यावर उचलून तिला पोलीस व्हॅनपर्यंत पोहोचवले. सोनावणे यांनी केलेल्या या कामगिरीचं आता पोलीस दलात कौतुक होतं आहे. तसेच नाशिक पोलीस दलाचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी देखील सोनावणे यांचे कौतुक केले आहे. 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT