Nawab Malik Bail : सुप्रीम कोर्टात मलिकांना अखेर दिलासा, पण तात्पुरता

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Supreme court of india granted bail to former minister Nawab malik.
Supreme court of india granted bail to former minister Nawab malik.
social share
google news

Nawab Malik gets bail in money laundering case : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत असलेल्या मलिकांना अखेर जामीन मिळाला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आज मलिकांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला. मात्र, हा दिलासा तात्पुरतात असणार आहे. (Supreme Court granted bail to Ncp leader nawab malik)

ADVERTISEMENT

माजी अल्पसंख्याक मंत्री ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती. फेब्रवारी 2022 मध्ये नवाब मलिकांना ईडीने अटक केली होती. तब्बल 17 महिन्यानंतर मलिक तुरुंगातून बाहेर येणार आहे. सुप्रीम कोर्टाने मलिकांना वैद्यकीय आधारावर जामीन मंजूर केला.

मलिकांना तात्पुरता दिलासा

नवाब मलिक यांना दीड वर्षानंतर दिलासा मिळाला असला, तरी तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. सुप्रीम कोर्टाने मलिकांना 2 महिन्यांसाठीच जामीन दिला आहे. जामीन वाढवून घेण्यासाठी मलिकांना पुन्हा कोर्टात धाव घ्यावी लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने त्यावेळी जर मागणी फेटाळली, तर मलिकांना पुन्हा तुरुंगात जावे लागेल.

हे वाचलं का?

वाचा >> स्क्रॅप मर्चंट ते कॅबिनेट मंत्री ‘असा’ आहे शरद पवारांच्या लाडक्या नवाब मलिकांचा प्रवास

ईडीने सुप्रीम कोर्टात काय घेतली भूमिका?

नवाब मलिक यांना किडनीशी संबंधित व्याधी असून, त्यासाठी ते सातत्याने जामिनासाठी प्रयत्न करत होते. पण, ईडीकडून सातत्याने विरोध केला गेला. मात्र, यावेळी ईडीने मलिकांना जामीन देण्यास कोणताही विरोध केला नाही.

मलिकांचं प्रकरण काय?

देवेंद्र फडणवीस यांनी 2022 मध्ये नवाब मलिकांविरुद्ध पहिल्यांदा आरोप केले होते. नवाब मलिकांनी 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खान आणि सरदार पटेल याच्याकडून कुर्ला येथे जमीन विकत घेतली. यासाठी 55 लाख हसीना पारकरला दिले गेले, असे फडणवीस म्हणाले होते. या पैशांचा वापर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी केला गेल्याचा आरोप आहे. त्यानंतर या प्रकरणाचा एनआयए आणि नंतर ईडीने तपास सुरू केला होता.

ADVERTISEMENT

वाचा >> क्रोनोलॉजी समझिये… पाहा आर्यन खानसाठी पुढे सरसावलेले नवाब मलिक कसे सापडले ईडीच्या जाळ्यात! – Mumbai Tak

या प्रकरणी NIA ने FIR 3 फेब्रुवारीला दाखल केली होती त्यानंतर भादंवि कलम 17, 18, 20, 21, 38 आणि 40 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीने या प्रकरणी चौकशी सुरू केली होती. नंतर ईडीने मलिकांना अटक केली होती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT