Noel Tata : रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला! कुटुंबातील 'ही' व्यक्ती सांभाळणार 3800 कोटींचं साम्राज्य ?
Noel Tata Appointed as New Chairman of Tata Trust : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा उत्तराधिकारी अखेर निवडण्यात आला आहे. नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर आज मुंबईत एक बैठक पार पडली होती. या बैठकीत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
रतन टाटा यांच्या निधनानंतर मुंबईत बैठक
नोएल टाटांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती
बैठकीत सर्वांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला
Noel Tata Appointed as New Chairman of Tata Trust : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा उत्तराधिकारी अखेर निवडण्यात आला आहे. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर आज मुंबईत एक बैठक पार पडली होती. या बैठकीत नोएल टाटा (Noel Tata) यांची टाटा ट्रस्टचे (Tata Trust) नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.बैठकीत सर्वांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष असणार आहेत. (noel tata appointed as new chaiman of tata trust after ratan tata death)
ADVERTISEMENT
टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष बनण्यासोबतच नोएल यांची टाटा समूहाच्या सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट या दोन महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते या संस्थेत विश्वस्त म्हणून कार्यरत होते. आता ते या संस्थेचा कार्यभार पाहतील. आधी रतन टाटा हे काम पाहत होते. स्वत: रतन टाटा यांनी या संस्था उभारण्यात मोलाची भूमिका निभावली होती. टाटा समूहाची होल्डींग कंपनी टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा मोठा हिस्सा आहे. यातील वाटा सुमारे 66 टक्के आहे. टाटा समूह टाटा ट्रस्ट अंतर्गत कार्यरत आहे. हा ट्रस्ट परोपकारी उपक्रम आणि प्रशासनावर देखरेख करण्यासाठी काम पाहते.
हे ही वाचा : Ratan tata Net worth : कोट्यवधींची संपत्ती मागे सोडून गेले रतन टाटा, किती होतं नेटवर्थ?
टाटा ग्रुपमध्ये आधी 'ही' जबाबदारी सांभाळायचे
रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याकडे टाटा ट्रस्टची नवी जबाबदारी देण्यात आली आहे. टाटा ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून नोएलचाही सहभाग होता. गेल्या काही वर्षांपासून ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे अध्यक्षही आहेत. त्यांचा टाटा समूहाशी चार दशकांचा मोठा इतिहास आहे. ते ट्रेंट, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या कंपन्यांचे अध्यक्ष आहेत. एवढेच नाही तर ते टाटा स्टील आणि टायटन कंपनी लिमिटेडचे उपाध्यक्ष म्हणून काम करतात. याशिवाय त्यांचे टाटा इकोसिस्टमशीही सखोल संबंध आहेत.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Ratan Tata : पारशी समुदायात गिधाडांसाठी ठेवतात मृतदेह, रतन टाटांवर विद्युतदाहिनीत का झाले अंत्यसंस्कार?
कोण आहेत नोएल टाटा?
नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटा यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा तर आईचं नाव सोनी टाटा होतं. नवल टाटा यांनी दोन लग्नं केली होती. नवल टाटांचं पहिलं लग्न सूनी कमिश्रिएट यांच्याशी झालं होतं. सूनी व नवल दाम्पत्याला दोन मुलं होती. रतन व जिमी अशी त्यांची नावं आहेत. या दोघांनी देखील लग्नं केली नाहीत. तर, नवल यांनी १९५५ मध्ये स्वित्झर्लंडमधील उद्योजिका सिमोन यांच्याशी दुसरं लग्न केलं. या जोडप्याने एका मुलाला जन्म दिला. तो मुलगा म्हणजे नोएल टाटा.
500 डॉलर्सची कंपनी 3 अब्ज डॉलर्सपर्यंत नेली
टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून आपल्या कार्यकाळात, त्यांनी 2010 आणि 2021 दरम्यान कंपनीचा महसूल $500 दशलक्ष वरून $3 अब्ज पर्यंत वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ट्रेंट लिमिटेड कंपनीचे 1998 साली फक्त एकच किरकोळ स्टोअर होते, जे आज त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतात 700 पेक्षा जास्त स्टोअर्स असलेल्या मजबूत नेटवर्कमध्ये बदलले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT