Odisha Train Accident : …तर 288 जण वाचले असते, 3 महिन्यांपूर्वी काय घडलेलं?
सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मोठे अपघात कसे घडू शकतात, हे या अधिकाऱ्याने रेल्वेच्या निदर्शनास आणून दिले होते.
ADVERTISEMENT

Odisha train accident reason in marathi : ओडिशात झालेल्या रेल्वे अपघाताने सगळेच हादरले. यामध्ये आतापर्यंत 288 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तपास अहवाल आल्यानंतरच या अपघातामागील नेमकं कारण स्पष्ट होईल, मात्र सध्या रेल्वेच्या एका अधिकाऱ्याचे पत्र समोर आले आहे. या पत्रात अपघाताच्या सुमारे 3 महिन्यांपूर्वी रेल्वे अधिकाऱ्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली होती. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मोठे अपघात कसे घडू शकतात, हे या अधिकाऱ्याने रेल्वेच्या निदर्शनास आणून दिले होते. (Railway officer had given a warning 3 months ago, expressed apprehension of a major accident)
हरिशंकर वर्मा यांनी रेल्वे बोर्डाला हे पत्र लिहिले होते. ते उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे सेवेत आहेत. ते तीन वर्षांपासून दक्षिण पश्चिम रेल्वेत कार्यरत आहेत. तेव्हा ते प्रिन्सिपल चीफ ऑपरेशन मॅनेजर होते. त्यांच्या पोस्टिंगच्या काळात दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये चुकीच्या मार्गावर ट्रेन गेल्याची प्रकरणे समोर आली होती.
दोषींवर कठोर कारवाई करावी
रेल्वे अधिकारी हरिशंकर यांनी असलेल्या त्रुटींकडे लक्ष वेधले होते. इंटरलॉकिंगसाठी असलेल्या सिस्टमला बायपास करून लोकेशन बॉक्सशी छेडछाड करण्याशी त्याचा संबंध होता. हे तात्काळ थांबवलं जावं असं त्यांनी पत्रातून रेल्वे बोर्डाला सांगितले होते.
हेही वाचा >> भाजप-शिवसेनेत जागावाटपावरून ठिणगी, शिंदेंच्या मंत्र्यांने दिला इशारा!
त्यावेळी घडलेल्या घटनेचा संदर्भ देत जे काही घडले, त्याकडे गांभीर्याने पाहावे, असे पत्रात त्यांनी लिहिले होते. यामध्ये जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावरही कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती, मात्र पत्र देऊनही कारवाई झाली नाही.