भाजप-शिवसेनेत जागावाटपावरून ठिणगी, शिंदेंच्या मंत्र्यांने दिला इशारा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Lok Sabha 2024 Seat Allocation: Shiv Sena minister Tanaji Sawant has warned BJP saying that he will contest 23 Lok Sabha seats.
Lok Sabha 2024 Seat Allocation: Shiv Sena minister Tanaji Sawant has warned BJP saying that he will contest 23 Lok Sabha seats.
social share
google news

Maharashtra politics news : राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघात भाजपची तयारी सुरू असल्याने अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता शिवसेना आणि भाजपचे दोन नेते जागावाटपावरून आमने-सामने आले. (shiv sena bjp alliance latest news)

भाजप-शिवसेना युतीमध्ये लोकसभा मतदारसंघ आधीपासूनच निश्चित आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपची जोरात मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे या जागांवर भाजपकडून ऐनवेळी दावा केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडे उमेदवारच नाही, असं विधान केलं होतं. तेव्हापासून या चर्चा सातत्यानं डोकं वर काढत आहेत.

हेही वाचा >> विनोद तावडे म्हणाले भाजपमध्ये परत या, एकनाथ खडसेंनी केलं मोठं विधान

आता त्यातच धाराशिवचे भाजपचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांनी एक विधान केलं. ते म्हणाले, “2024 मध्ये धाराशिवमध्ये भाजपचा खासदार व्हावा. आपल्या हक्काचे मोदी सरकार 2024 मध्ये पुन्हा यावे. त्यासाठी भाजपला धाराशिवची जागा जिंकावी लागेल.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

धाराशिव मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. सध्या इथे ठाकरेंच्या गटात असलेले ओमराजे निंबाळकर खासदार आहेत. पण, पक्षात झालेली फुटीनंतर शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने इथे तयारी सुरू केली आहे. त्यातच राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेल्या विधानाने शिवसेनेतील नेते आक्रमक झाले आहेत.

तानाजी सावंत यांचा भाजपला इशारा

राणा जगजित सिंह पाटील यांच्या इशाऱ्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी भाजपला इशारा दिला. “आमची शिवसेना आणि एकनाथ शिंदेही लोकसभेच्या 23 जागा लढवण्यासाठी ठाम आहेत. गेल्यावेळी लढवलेल्या 23 पैकी 18 जागा आम्ही जिंकल्या होत्या. त्यामुळे या 18 जागा तर लढवूच पण, पराभूत झालेल्या जागाही आम्ही सोडणार नाही. धाराशिव लोकसभेची जागाही आम्हीच लढवणार आहोत. कुणी आम्हाला गृहीत धरू नये”, असं तानाजी सावंत म्हणाले.

ADVERTISEMENT

भाजपच्या मिशन 144 मध्ये शिवसेनेचेही मतदारसंघ

भाजपच्या मिशन 144 मध्ये महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात शिवसेनेकडे असलेल्या लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे. शिवसेनेत फूट पडण्यापूर्वीपासूनच भाजप या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Cabinet Expansion in Maharashtra : शाह, शिंदे आणि फडणवीसांमध्ये काय झाली चर्चा?

शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपकडून सुरू असलेल्या तयारीबद्दल पक्षाच्या नेत्यांनी भूमिका मांडल्या आहेत. ज्या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार असतील तिथे त्यांना मदत केली जाईल, असं पक्षाचे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेले आहेत. मात्र, तरीही राजकीय वर्तुळात भाजपच्या भूमिकेबद्दल उलट सुलट चर्चा होत आहे.

कोणत्या मतदारसंघात शिवसेनेचे नेते अस्वस्थ?

श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपकडून तयारी सुरू आहे. केंद्रीय मंत्र्यांचे सातत्याने दौरे सुरू आहेत. दुसरीकडे हातकंणगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातही भाजपच्या नेत्यांचे दौरे सुरू आहेत. तिथेही भाजप उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघही शिवसेनेकडे आहे. मात्र, तिथेही भाजपने केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना तयारी करण्यास सांगितले असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू आहे. हिंगोली, परभणी, कोल्हापूर, अमरावती या मतदारसंघातही अशाच चर्चा सुरू आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT