Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची संपूर्ण यादीच आली समोर!
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्याची आता संपूर्ण याची समोर आली आहे.
ADVERTISEMENT

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पूर्ण तयारीने हा हल्ला केला. हा संपूर्ण हल्ला मुंबईवरील 26/11 हल्ल्याच्या धर्तीवर नियोजित होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पहलगामच्या जंगलात 5 ते 6 पाकिस्तानी दहशतवादी लपून बसले होते. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांनी परिसरात फिरून रेकी केली आणि योग्य वेळ साधत निष्पाप लोकांवर हल्ला केला.
हल्ल्यापूर्वी केलेली हायटेक तयारी...
गुप्तचर संस्थांनुसार, दहशतवाद्यांनी आपल्या बॅगांमध्ये सुकामेवा, औषधे आणि संपर्क साधने आणली होती. यावरून असे दिसून येते की, दहशतवादी हे एका दीर्घ कारवाईच्या तयारीने आले होते.
हे ही वाचा>>मुलाची 10वीची परीक्षा संपली म्हणून काश्मीरला नेलं, पण... डोंबिवलीच्या हेमंत जोशींना बायको-मुलासमोरच संपवलं!
पहलगाममधील बेसरन हा परिसर चारी बाजूने डोंगरांनी वेढलेला आहे. ज्याच्या मधोमध एक प्रचंड मोठं गवताळ मैदान आहे. या भागात फक्त पायी किंवा घोड्यावरून पोहोचता येतं. पहलगाम शहर ते बेसरन हे अंतर 6 किमी आहे. हा संपूर्ण परिसर पर्वत आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे आणि खूप उंचावर आहे. येथे वाहनेही पोहोचू शकत नाहीत. हे पर्यटक आणि ट्रेकर्सचे आवडते ठिकाण आहे. या भागात सुरक्षा दलांची तैनाती नाही.
AK-47 मधून सतत गोळ्यांचा वर्षाव
हल्ल्यादरम्यान तीन ते चार दहशतवाद्यांनी AK-47 ने सतत गोळीबार केला. यातील दोन दहशतवादी पश्तो भाषेत बोलत होते, ज्यावरून ते पाकिस्तानी असल्याची पुष्टी होते. त्यांच्यासोबत दोन स्थानिक दहशतवाद्यांचीही ओळख पटली आहे. त्यांची नावे आदिल अहमद ठाकूर (गुरी, बिजबेहरा) आणि आसिफ शेख (मोंघामा, त्राल) अशी देण्यात आली आहेत.










