PM Modi Visit : “भाजप मोदींना तिथे पाठवणार असेल तर…”; संजय राऊतांचं नवं चॅलेंज
मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याबद्दल संजय राऊत म्हणाले की, “पंतप्रधानांना वेळ मिळाला कारण कोणत्याही क्षणी आता निवडणुका जाहीर होतील. चार शंकराचार्यांनी त्या अपूर्ण मंदिरातील सोहळ्याला येण्यास नकार दिला. मला असं वाटतं की, स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या या प्रमुख नेत्याने याचा विचार करायला पाहिजे होता.
ADVERTISEMENT
Sanjay Raut On PM Modi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात त्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतलं. या मंदिरात उद्धव ठाकरे हे २२ जानेवारी रोजी जाणार आहेत. त्याआधीच मोदींनी भेट दिल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपला नवं आव्हान दिलं आहे.
ADVERTISEMENT
माध्यमांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळाराम मंदिर भेटीबद्दल राऊत म्हणाले, “आज मोदी हे नाशिकला येताहेत. त्यांच्या कार्यक्रमात आधी काळाराम मंदिर दर्शनाचा आधी उल्लेख नव्हता. त्यांचा रोड शो होता. इतर योजना होती. पण, काळाराम मंदिरात जाऊन पूजा अर्चा आरती हा अचानक कार्यक्रम ठरवण्यात आला. याच कारण असं की २२ जानेवारीला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरात जायची घोषणा करते.”
हेही वाचा >> ठाकरेंच्या आमदारांना ऐकावाच लागणार शिंदेंचा आदेश!
संजय राऊत पुढे म्हणाले की, “त्याचवेळी भाजपला काळाराम मंदिराची आणि रामाची आठवण होते. मग पंतप्रधानांना तो कार्यक्रम घ्यायला लावून आणि काळाराम मंदिरात जाऊन आम्ही कशी शिवसेनेवर कुरघोडी केली… अरे राम हे काय कुरघोडी करण्याचे साधन आहे का?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
हे वाचलं का?
“आम्ही मणिपुरमधील राम मंदिरात जाणार”
“आम्ही काळाराम मंदिरात गेलो म्हणून पंतप्रधान येणार असतील, तर आम्ही काल सांगितलं आहे की मणिपूरच्या राम मंदिरातही शिवसेना जाईल. इतका हिंसाचार तिथे उसळला आहे. हजारो लोकांच्या हत्या झाल्या आहेत. अद्याप तिथे मोदी गेले नाहीत. मग ठिक आहे… जर शिवसेना किंवा उद्धव ठाकरे एखाद्या ठिकाणी जाणार आहे म्हणून भाजप मोदींना तिथे पाठवणार असेल,तर आनंदाची गोष्ट आहे”, असे म्हणत राऊतांनी भाजपला लक्ष्य केले.
हेही वाचा >> मोहोळ हत्येचे कराड कनेक्शन! पुणे पोलिसांनी एकाला केली अटक
“आमचं असं ठरतंय की, २२ तारखेनंतर आम्ही अयोध्येत जाणार आहोत. मणिपूरमध्ये रामाचं मंदिर आहे, उद्धव ठाकरे आणि आम्ही तिथेही जाण्याच्या विचारात आहोत. त्यानिमित्ताने का होईना नरेंद्र मोदी मणिपुरात येतील आणि तिथल्या समस्या बघतील”, असे म्हणत संजय राऊतांनी मोदींना मणिपुरला जाण्याचं आव्हान दिलं आहे.
ADVERTISEMENT
“मोदी सर्वात मोठे शंकराचार्य, असं भाजपला…”
राऊत पुढे म्हणाले की, “या देशातील सगळ्यात मोठे शंकराचार्य सध्या नरेंद्र मोदी आहेत, असं भाजपला वाटतं असावं. त्यामुळे शंकराचार्यांच्या मतांना आणि भूमिकांना त्यांनी फार किंमत दिली नसावी. राम मंदिर हे कारसेवकाच्या बलिदानातून उभं राहिलं आहे, असे त्यांना वाटत नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाने उभं राहिलं आहे, असेही त्यांना वाटतं नसावं. ते फक्त एका व्यक्तीमुळेच उभं राहिलं आहे, त्यामुळे त्यांना जसं हवं, तसं ते करून घेत आहे”, असं टीकास्त्र संजय राऊतांनी डागलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT