Lok Sabha Elections Result : निकालआधी मोदी जाणार 'या' खास ठिकाणी
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024) प्रचाराचा शेवटचा टप्पा संपत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आध्यात्मिक प्रवासाला निघणार आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
स्वामी विवेकानंदांनी 132 वर्षांपूर्वी इथेच केली होती तपश्चर्या
2014 मध्ये PM मोदींनी प्रतापगडावर जाऊन घेतले होते आशीर्वाद
कोलकात्यातील बेलूर मठातही मोदींनी केलं होतं ध्यान
PM Narendra Modi : लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024) प्रचाराचा शेवटचा टप्पा संपत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आध्यात्मिक प्रवासाला निघणार आहेत. ते तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे ध्यानधारणा करणार आहेत. 30 मे रोजी पंतप्रधान मोदी कन्याकुमारीला पोहोचतील आणि 1 जूनपर्यंत तिथेच मुक्काम करतील. (PM Modi will meditate at the Swami Vivekananda Rock Memorial in Tamil Nadu after last phase of the Lok Sabha Elections 2024 )
ADVERTISEMENT
कन्याकुमारीमध्ये समुद्राच्या मध्यभागी असलेल्या विशाल खडकावर बसून ते ध्यान करणार आहेत. हे ते खडक आहे जिथे स्वामी विवेकानंदांनी ध्यान केले होते. निवडणूक प्रचारानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच ध्यानधारणा करणार आहेत, असं नाहीये. 2014 मध्येही ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगड किल्ल्यावर गेले होते तर, 2019 मध्ये ते उत्तराखंडमधील केदारनाथ गुहेत गेले होते. मोदींनी आतापर्यंत देशात जिथे-जिथे भेट दिली तिथे पर्यटनाला प्रचंड गती मिळाली आहे. पर्यटकांची संख्याही झपाट्याने वाढली आहे.
हेही वाचा : Lok Sabha : महाराष्ट्रात भाजपचे 'मिशन 45' फसणार? काय आहे कारण?
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात म्हणजेच 1 जून रोजी शेवटचं मतदान होणार आहे. तर, 30 मे रोजी सायंकाळी 5 वाजता शेवटच्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावतील. पीएम मोदी पंजाबमधील होशियारपूर येथे आपली शेवटची सभा घेणार असून त्यानंतर ते तामिळनाडूतील कन्याकुमारीला रवाना होतील. पंतप्रधान तेथून 500 मीटर अंतरावर असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पोहोचतील आणि 31 मे ते 1 जून ध्यान मंडपममध्ये ध्यान करतील. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
हे वाचलं का?
स्वामी विवेकानंदांनी 132 वर्षांपूर्वी इथेच केली होती तपश्चर्या
विवेकानंद रॉक मेमोरियल हे तेच ठिकाण आहे जिथे 132 वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी तीन दिवस पोहून ध्यान केले होते. 25, 26, 27 डिसेंबर 1892 रोजी स्वामीजींनी येथे तपश्चर्या केली. इथेच त्यांना भारतमातेची दैवी संकल्पना जाणवली असे म्हणतात. इतकेच नाही तर माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनीही येथे दोन तास ध्यान केले होते.
हेही वाचा : 'मंत्रालयाचा सहावा मजला अन् डॉ.अजय तावरेंच्या जीवाला धोका'
या प्रवासाचा स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला. लोकांचा असा विश्वास आहे की जसे गौतम बुद्धांच्या जीवनात सारनाथला विशेष स्थान आहे, त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांच्या जीवनातही कन्याकुमारीतील या स्थानाला विशेष महत्तव आहे. देशभर फिरून त्यांनी येथे पोहोचून तीन दिवस तपश्चर्या केली आणि विकसित भारताचे स्वप्न पाहिले. त्याच ठिकाणी ध्यान करून स्वामीजींच्या विकसित भारताचे व्हिजन जिवंत करण्याची पीएम मोदींची वचनबद्धता दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
2014 मध्ये प्रतापगडावर जाऊन घेतले होते आशीर्वाद
2014 मध्ये निवडणूक प्रचार संपल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडला भेट दिली होती. जिथे शिवाजी महाराजांनी वाघनखांनी अफजल खानचा वध केला होता. कधी उंच पर्वतांची शांतता, कधी समुद्राच्या लाटांचा आवाज तर कधी ऐतिहासिक महत्त्व असलेले किल्ले. पीएम मोदी अनेक ठिकाणी भेट देताना दिसतात.
ADVERTISEMENT
कोलकात्यातील बेलूर मठातही मोदींनी केलं होतं ध्यान
पीएम मोदी 2015 मध्ये कोलकाता येथे पोहोचले होते आणि तेथे त्यांनी बेलूर मठात ध्यान केले होते. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर ते 11 मे 2015 रोजी बेलूर मठात पोहोचले. प्रवासादरम्यान त्यांनी ज्या खोलीत स्वामी विवेकानंद स्वतः ध्यान करत असत त्या खोलीत ध्यान केले.
हेही वाचा : सुप्रिया सुळे की, सुनेत्रा पवार... सट्टा बाजाराचा अंदाज काय सांगतोय?
2019 चा प्रचार संपताच PM मोदींनी गाठलं होतं केदारनाथ
पीएम मोदींचा केदारनाथशी 5 दशकांहून अधिक काळापासूनचा जुना संबंध आहे. 1968 मध्ये पीएम मोदी अध्यात्माच्या शोधात वडनगरहून कोलकातासाठी निघाले. नंतर विविध ठिकाणी फिरत ते केदारनाथपासून तीन किमी अंतरावर असलेल्या गरुड चट्टीवर पोहोचले. पीएम मोदींनी जवळपास दीड महिना तेथे ध्यान केले होते. लोकसभा निवडणूक 2019 चा प्रचार संपताच पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा केदारनाथला पोहोचले आणि तेथील एका गुहेत ध्यान केले. त्यांच्या या भेटीची जगभरात चर्चा झाली.
PM मोदींनी यावर्षी द्वारका शहराला दिली होती भेट
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी द्वारकाजवळ असलेल्या अरबी समुद्रात डुबकी मारली. द्वारकाधीशचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी नौदलाच्या जवानांसह गोमती घाटावर असलेला सुदामा पूल पार करून पंचकुई समुद्रकिनारी पोहोचले. यावेळी ते डायव्हिंग हेल्मेट आणि भगव्या कपड्यांमध्ये दिसले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT