ISRO Chandrayaan 3 Pragyan Rover : प्रज्ञानचा ‘मूनवॉक’! चंद्रावर पहिला व्हिडीओ
Chandrayaan-2’s orbiter has taken a picture of Chandrayaan-3’s lander from above. ISRO has also released the video of Pragyan Rover’s exit from Vikram Lander. This video is awesome.
ADVERTISEMENT
Chandrayaan-3 Pragyan Rover land on Moon : चांद्रयान 3 मोहिमेच्या संशोधनाला सुरूवात झालीये. विक्रम लँडरमध्ये असलेले प्रज्ञान रोव्हर बाहेर आले असून, लँडरमधून बाहेर पडतानाच व्हिडीओ इस्रोने शेअर केला आहे. दुसरीकडे चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरमधून एक नवीन संदेश आलाय. चांद्रयान-3 च्या लँडरवर नजर ठेवून असल्याचा मेसेज त्याने पाठवलाय. (Chandrayaan 3 : Pragyan rover started work)
ADVERTISEMENT
चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने चांद्रयान-3 च्या लँडरचे वरून छायाचित्रही घेतले आहे. दोन्ही फोटो बघितल्यास ज्यात डावीकडील फोटोतील जागा रिकामी आहे. उजव्या फोटोमध्ये, विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना दिसत आहे.
लँडर उजवीकडील चित्रात स्पष्ट दिसत आहे. तो इनसेटमध्ये झूम करून देखील दाखवला आहे. चांद्रयान-2 मध्ये ऑर्बिटर हाय रिझोल्यूशन कॅमेरा (OHRC) आहे. यावेळी चंद्राभोवती फिरणाऱ्या सर्व देशांच्या ऑर्बिटरमध्ये चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरमध्ये सर्वोत्कृष्ट कॅमेरा आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Chandrayaan-3 : विक्रम लँडरवर ‘सोनेरी कोटिंग’ का लावलं जातं तुम्हाला माहितीये का?
दोन्ही छायाचित्रे प्रक्षेपणाच्या दिवशी काढण्यात आली होती. डावीकडील पहिले छायाचित्र 23 ऑगस्ट रोजी दुपारी 2.28 वाजता घेतले होते, ज्यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर कोणतेही लँडर दिसत नाही. दुसरे छायाचित्र 23 ऑगस्ट रोजी रात्री 10.17 वाजता घेण्यात आले. ज्यामध्ये विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेले दिसत आहे.
Here is how the Lander Imager Camera captured the moon’s image just prior to touchdown. pic.twitter.com/PseUAxAB6G
— ISRO (@isro) August 24, 2023
ADVERTISEMENT
ऑर्बिटरने छायाचित्र घेतले, तेव्हा पृथ्वीवर होती रात्र
लँडरचा फोटो रात्री 10.15 च्या सुमारास घेतलेले आहे, म्हणून त्याबद्दल गोंधळून जाण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी विक्रम लँडर चंद्रावर उतरले आहे, तेथे पुढील 14-15 दिवस प्रकाशच असेल. त्यामुळे 23 ऑगस्टच्या संध्याकाळी लँडिंगची वेळ निवडण्यात आली. जेणेकरून सूर्यप्रकाश सतत मिळू शकेल. त्यावेळी आपल्यासाठी पृथ्वीवर रात्र होती, पण तिथे नुकताच सूर्य उगवला होता. चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील 14 दिवसांइतका असतो. त्यामुळे आता तिथे सूर्यप्रकाश वाढत जाईल.
ADVERTISEMENT
इस्रोने शेअर केला प्रज्ञान रोव्हरचा बाहेर येतानाचा व्हिडिओ
इस्रोने विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हरचा बाहेर पडतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूपच जबरदस्त आहे. लँडरच्या रॅम्पमधून रोव्हर कसे बाहेर येत आहे ते तुम्ही खालील व्हिडीओमध्ये पाहू शकता. रोव्हरचे सोलर पॅनेल उंचावलेले दिसतात. म्हणजेच सूर्यापासून ऊर्जा घेऊन तो कामाला सुरुवात करेल.
#Chandrayaan3 Rover ramped down from the Lander to the Lunar surface pic.twitter.com/vyqNR6cGkX
— LVM3-M4/CHANDRAYAAN-3 MISSION (@chandrayaan_3) August 25, 2023
लँडिंगच्या आधीचा एक आश्चर्यकारक व्हिडिओ
यानंतर इस्रोने लँडिंगच्या आधीचा व्हिडिओ जारी केला. हा व्हिडिओ लँडरमध्ये बसवण्यात आलेल्या लँडर इमेजर कॅमेऱ्याने शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये 30 किमीवरून खाली आल्यावर लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर कसा उतरला हे स्पष्टपणे दाखवण्यात आले आहे. एवढेच नाही तर तो स्वतः उतरण्यासाठी योग्य जागा निवडत असल्याचेही दिसून येत आहे. जेणेकरून ते सुरक्षित लँडिंग करू शकेल.
हेही वाचा >> Sharad Pawar : ‘थोडी अक्कल तर वापरा’, ‘तो’ प्रश्न ऐकताच पवारांचा चढला पारा
लँडरच्या चारपैकी तीन पेलोड्स होते सुरू
याआधी इस्त्रोने ट्विट करून चांद्रयान-३ च्या लँडर आणि रोव्हरशी संबंधित सर्व काम व्यवस्थित सुरू असल्याचे सांगितले होते. दोन्ही सुस्थितीत असल्याचे म्हटले होते. लँडर मॉड्यूलचे पेलोड्स Ilsa (ILSA), Rambha (RAMBHA) आणि Chaste (ChaSTE) चालू केले आहेत. रोव्हरचे मोबिलिटी ऑपरेशन सुरू झाले आहे. याशिवाय, प्रोपल्शन मॉड्यूलवरील पेलोड शेप की चालू केली आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी आहे का?
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर गोठलेले पाणी असण्याची शक्यता आहे. जगभरातील अंतराळ संस्था आणि खासगी कंपन्यांचं असंच मत आहे. याचा अर्थ भविष्यात, पाणी असलेल्या ठिकाणी मून कॉलोनी बांधली जाऊ शकते. चंद्रावर खाणकाम सुरू होऊ शकते. इतकंच नाही, तर येथून मंगळावर यान पाठवता येतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT