Pune, MPSC: आधी दर्शना पवारला क्रूरपणे मारलं, आता राहुल हांडोरे म्हणतो; मला…
Marathi News Breaking: दर्शना पवार हिच्या हत्येप्रकरणी आरोपी राहुल हांडोरे याने आता नवी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना दिली आहे. तसेच त्याच्या हातून जे निर्घृण कृत्य घडलं त्याबाबत त्याने पश्चातापही व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
Darshana Pawar Murder: पुणे: MPSC परीक्षेत (MPSC Exam) राज्यात तिसरा क्रमांक पटकावणारी दर्शना पवार (Darshana Pawar) हिच्या हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हांडोरेच्या (Rahul Handore) अटकेनंतर या प्रकरणातील नवनवी माहिती आता समोर येत आहे. याच विषयी मुंबई Tak च्या हाती आता आणखी एक नवी माहिती लागली आहे. ज्याविषयी आपण सविस्तरपण जाणून घेऊया. नुकतीच दर्शनाची वनविभागात क्लास वन अधिकारी म्हणून निवड झाली होती. पण नियुक्तीच्या आधीच तिचा मित्र राहुल हांडोरे याने 12 जून 2023 रोजी तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) केली. याच प्रकरणातील आरोपी राहुल हांडोरेची आता चार दिवसाची पोलीस कोठडी संपली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी चार दिवस विविध प्रकारे या प्रकरणाची चौकशी केली आहे. आरोपी राहुलकडून घटनाक्रम जाणून घेतला आहे. (pune mpsc passed darshana pawar murder case rahul handore accused pune rural police expressed regret heinous act marathi news breaking)
ADVERTISEMENT
याशिवाय संपूर्ण क्राईम सीन सुद्धा रिक्रिएट करण्यात आला होता. राहुल हांडोरेने पोलिसांना त्याच ठिकाणी नेलं ज्या ठिकाणी.. म्हणजे राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी, जिथे त्याने दर्शनाची हत्या केली.
राहुल हांडोरे म्हणतो मला आता पश्चाताप…
‘यावेळी आरोपी राहुल हांडोरेने पोलिसांनी हे देखील सांगितलं की, आज त्याला प्रचंड पश्चाताप होत आहे. यावेळी तो असंही म्हणाला की, हे जे कृत्य घडलं ते त्याला कधीही करायचं नव्हतं.
हे वाचलं का?
राजगडाच्या पायथ्याशी काय घडलं?
हत्येच्या दिवशी म्हणजे 12 जून रोजी पुण्यातून निघाल्यानंतर राजगडच्या पायथ्याशी साधारण 8.30 च्या सुमारास पोहचले. हे अंतर पुण्यापासून साधारण 65 किमी आहे. तिथे पोहचल्यावर त्याने नाश्ता केला. याच दरम्यान राहुलने दर्शनाला परत एकदा प्रेमाचा प्रस्ताव, लग्नाचा प्रस्ताव पुढे ठेवला. पण तिने हा प्रस्ताव स्वीकारला नाही. त्यामुळे दोघांमध्ये बराच वाद झाला. बाचाबाची झाली.
यावेळी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुलने खिशात एक ब्लेड नेलं होता. त्याचा उद्देश जरी त्या ब्लेडचा वापर दर्शनाचा खून करणे किंवा तिला इजा पोहचवणं असा नव्हता तरी. त्यावेळेस दोघांमध्ये जो वाद झाला त्यानंतर राहुल हांडोरेने टोकाचं पाऊल उचललं. ज्यामुळे दर्शनाचा घात झाला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Amol Mitkari : “पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार, हे बावनकुळेंना माहितीये”
सुरुवातीला तिच्या मानेवर जोरदार वार झाला. यानंतर तिच्या मानेतून प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे ती खाली कोसळली. यावेळी राहुल हांडोरेने तिथेच बाजूला पडलेला एक मोठा दगड उचलून थेट दर्शनाच्या डोक्यात घातला. त्यानंतर अनेक वार त्याने दर्शनाच्या शरीरावर केले. अनेक ठिकाणी त्याच ब्लेडच्या खुणा, जखमा आहेत.
ADVERTISEMENT
पण 18 जूनला दर्शना पवारचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना सापडला त्यानंतर शवविच्छेदनानंतर या सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला. राहुल हांडोरेने सुद्धा आपलं कृत्य कबूल केलं आहे.
पोलिसांना ते दुकान सुद्धा सापडलं आहे जिथे राहुलने हे ब्लेड विकत घेतलं होतं. ब्लेड जरी छोटंसं असलं तरीही खूप इजा पोहचवणारं आहे. त्याला धारदार शस्त्रही म्हटलं जातं. त्याच ब्लेडने दर्शनाच्या गळ्यावर ब्लेडने वार केला. त्यानंतर जी झटापट झाली त्यामध्ये तिचा प्राण गेला.
पुणे, MPSC अन् राहुलच्या दर्शनाकडून भलत्याच अपेक्षा
दुसरी अशीही माहिती समोर आली आहे की, राहुल हांडोरे जेव्हापासून दर्शना पवार पुण्यात MPSC ची तयारी करण्यासाठी आली.. ती स्वत:हून अभ्यास करत होती. पण राहुलचं म्हणणं आहे की, तो तिला MPSC अभ्यासात पुस्तकं विकत घेण्यात, शॉपिंगमध्ये मदत करायचा. तिचा हितचिंतक म्हणून तिच्यासोबत राहायचा. याच दरम्यान, तिच्या लहानपणीच्या मित्र असल्याचा त्याने गैरफायदा घेतला.
हे ही वाचा >> व्लादिमीर पुतिन यांना निष्ठावंत येवजेनी प्रिझोझिनीने का दिला दगा? समजून घ्या
दर्शना पुण्यात आल्यावर त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने जी तिला मदत केली आणि तिचा जो चांगुलपणा.. राहुल आपला मित्र आहे या समजुतीतून ती त्याची मदत स्वीकारत होती. पण याचाच राहुलने चुकीचा अर्थ घेतला. त्याला वाटलं की, दर्शना त्याच्या प्रेमात पडली आहे. मात्र, असं नव्हतं.
घटनेच्या दिवशी देखील दर्शनाने या गोष्टीला नकार दिला. ज्याचा राहुल हांडोरेला खूप राग आला. त्यानंतर त्याच्या हातून भयंकर असं कृत्य घडलं.
आता पूर्ण क्राइम सीन रिक्रिएट देखील झाला. राहुल हांडोरेला जरी पश्चाताप होत असला तरीही दर्शनाने आपला हकनाक जीव गमावला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT