Rajendra Patni : भाजपने आणखी एक आमदार गमावला, पाटणी यांचे निधन

ADVERTISEMENT

भाजपचे कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन.
Rajendra patni, bjp mla died by illness
social share
google news

Bjp Mla Rajendra Patni : लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्यानंतर भाजपने आणखी एक आमदार गमावला. भाजपचे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांची प्राणज्योत शुक्रवारी (23 फेब्रुवारी) मालवली. ते ५९ वर्षाचे होते.

कारंजाचे आमदार असलेले राजेंद्र पाटणी हे मागील २ ते ३ वर्षांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच २३ फेब्रुवारी सकाळी पाटणी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना किडणीचा विकार होता. दोन्ही किडण्या निकामी झाल्यामुळे ते उपचार घेत होते.

फडणवीसांनी व्यक्त केला शोक

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भरधाव कार डिव्हायडरवर धडकली, आमदार नंदिता यांचा मृत्यू

फडणवीस यांनी पुढे म्हटलं आहे की, "ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो", अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

ADVERTISEMENT

प्रकाश डहाकेंचा केला होता पराभव

पाटणी यांनी एकदा शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर ‘मोदी लाटेत’ त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विजय मिळवला. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पाटणी हेच उमेदवार असतील, असं म्हटलं जात होतं. 

ADVERTISEMENT

हेही वाचा >> BMC क्लार्क  ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री... असा होता मनोहर जोशींचा संघर्षमय प्रवास

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटणी यांना ७३ हजार २०५ मते पडली होती. प्रकाश डहाके यांना ५० हजार ४८१ मते मिळाली होती, तर वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी नाकारल्यामुळे ऐनवेळी बसपाकडून मैदानात उतरलेले युसूफ पुंजानी यांनी ४१ हजार ९०७ मते घेतली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT