Ram Temple : “राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला येऊ नका”, अडवाणी-जोशींना का करण्यात आली विनंती?
राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठपना कार्यक्रमाला येऊ नये अशी विनंती केली आहे.
ADVERTISEMENT

Lal Krishna Advani : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख (22 जानेवारी) अगदी जवळ आली आहे. दरम्यान, राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहू नये, असे आवाहन केले आहे.
चंपत राय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी प्रकृती आणि ज्येष्ठतेमुळे उद्घाटन समारंभाला उपस्थित राहू शकणार नाहीत. दोघेही वृद्ध आहेत. त्यामुळे त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना न येण्याची विनंती करण्यात आली आहे, जी दोघांनीही मान्य केली आहे.
चंपत राय यांनी मुरली मनोहर जोशींसोबत केली चर्चा
राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “अडवाणीजींची उपस्थिती अनिवार्य आहे, परंतु त्यांचे वय लक्षात घेता आम्ही त्यांना विनंती करू की त्यांनी कृपया येऊ नये.” लालकृष्ण अडवाणींबद्दल बोलल्यानंतर चंपत राय मुरली मनोहर जोशींबद्दल म्हणाले, “मी स्वतः डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्याशी बोललो आहे. मी त्यांना फोनवर येऊ नका, असे सांगितले. पण, ते मी येईन असे म्हणत राहिले. मी गुरुजींना न येण्याची वारंवार विनंती करत राहिलो. तुमचे वय आणि थंडी… त्यात तुम्ही नुकताच गुडघाही बदलला आहेस.”
कल्याण सिंग यांच्याशी संबंधित घटनेचा केला उल्लेख
कल्याण सिंह यांच्याशी संबंधित एका जुन्या घटनेचा संदर्भ देत चंपत राय म्हणाले की, 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या पायाभरणीच्या वेळी कल्याण सिंह यांनी आपण नक्की येऊ असा आग्रह धरला होता. चंपत राय पुढे म्हणाले, ‘मी त्याच्या (कल्याण सिंह) मुलाला सांगितले की, हो… हो म्हणत राहा, याचा शेवटच्या दिवशी विचार केला जाईल आणि शेवटच्या दिवशी आम्ही त्यांना सांगितले की त्यांनी येण्याची गरज नाही. हे त्यांनीही मान्य केले. घरातील मोठ्यांनाही अशाच प्रकारे समजावले जाते.