Ratan Tata Dies: रतन टाटांनी देशासाठी केलेल्या 'या' 5 गोष्टी, भारतीय कधीही नाही विसरणार!
Ratan Tata Death News: दिग्गज उद्योजक रतन टाटा यांचे काल (9 ऑक्टोबर) निधन झाले. रतन टाटा हे त्यांच्या दानशूर वृत्तीसाठी कायमच ओळखले जायचे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रतन टाटा यांच्या निधनाने भारतीय उद्योग क्षेत्राचं मोठ नुकसान

रतन टाटांचा देश निर्मितीत मोठा हात

रतन टाटांनी देशासाठी केलेल्या 5 मोठ्या गोष्टी
Ratan Tata Death News: मुंबई: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा हे आता आपल्यात नाहीत, वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. रतन टाटा यांचे नाव भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. भारतात ज्यावेळी उद्योगपतींचा उल्लेख होतो. त्यावेळी रतन टाटा यांचे नाव प्रथम घेतले जाईल. आपल्या जीवनाच्या सार्थक प्रवासात त्यांनी अनेक ऐतिहासिक कामे केली. (ratan tata did these 5 big things for the country indians will always be remembered)
खरे तर रतन टाटा यांना भारतीय उद्योगाचे जनक देखील म्हटले जाते. त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाने लोकांना प्रभावित केले. रतन टाटा यांनी जगाला अनेक मौल्यवान गोष्टी दिल्या आहेत. त्यांचे योगदान आज भारतासह संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. वास्तविक, राष्ट्र उभारणीत रतन टाटा यांचे अगणित योगदान आहे, जे विसरता येणार नाही. पण त्यापैकी त्यांची काही काम अशी आहेत ज्यांनी काळाच्या क्षितिजावर अमिट छाप सोडली आहे.
1. कोरोना काळात 500 कोटींची मदत
ज्या वेळी संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीशी झुंजत होते, त्याच वेळी भारतही आरोग्याच्या संकटाशी लढत होता. या संकटाच्या काळात रतन टाटा पुढे आले आणि त्यांनी देशाला 500 कोटी रुपयांची मदत दिली. त्यांनी X (ट्विटर) वर पोस्ट शेअर करताना म्हटलेलं, 'कोविड-19 हे आपल्यासमोरील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाच्या कंपन्या भूतकाळातही देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे आल्या आहेत. या वेळेची गरज इतर वेळेपेक्षा जास्त आहे.'
हे ही वाचा>> Ratan Tata Passed Away: भारताने गमावला दिलदार उद्योगपती, रतन टाटांचं निधन
2. पाळीव प्राण्यांसाठी 165 कोटींचे रुग्णालय
रतन टाटा त्यांच्या सौम्य स्वभावासाठी आणि दानशूरपणासाठी ओळखले जात होते. त्यांना कुत्र्यांची खूप आवड होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कुत्र्यांसाठी रुग्णालय उघडले होते. रुग्णालयाचे उद्घाटन करताना ते म्हणाले होते की, 'मी कुत्र्यांना माझ्या कुटुंबाचा भाग मानतो. मी माझ्या आयुष्यात अनेक पाळीव प्राणी पाळले आहेत. यामुळे मला हॉस्पिटलचे महत्त्व कळते.' त्यांनी नवी मुंबईत बांधलेले रुग्णालय पाच मजली असून, त्यामध्ये एकाच वेळी 200 पाळीव प्राण्यांवर उपचार करता येतात.