Subrata Roy : सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या मृत्यूचे कारण काय?

भागवत हिरेकर

Subrata Roy Death : सहारा इंडिया उद्योगाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे १४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

ADVERTISEMENT

Sahara India Group chief Subrata Roy passed away on Tuesday.
Sahara India Group chief Subrata Roy passed away on Tuesday.
social share
google news

Subrata Roy News : सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे मंगळवारी (१४ नोव्हेंबर) निधन झाले. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 75 वर्षांचे होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारणही समोर आले आहे. (Subrata Roy passes away)

सहारा कुटुंबाचे प्रमुख सुब्रतो रॉय हे दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी (१५ नोव्हेंबर) त्यांचे पार्थिव लखनौमधील सहारा शहरात आणले जाईल, तिथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.

हे ही वाचा >> रामदास कदमांनी घेतली शिंदेंची भेट, कीर्तिकरांबाबत मोठं विधान

सुब्रतो रॉय सहारा यांचा जन्म १० जून १९४८ रोजी झाला होता. ते भारतातील आघाडीचे व्यापारी आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना देशभरात ‘सहाराश्री’ म्हणूनही ओळखले जात होते.

समाजवादी पक्षाने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून श्री सुब्रतो रॉय यांच्या निधनाने दु:ख झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो. भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शोकभावना समाजवादी पक्षाने व्यक्त केल्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp