अनिल परबांना क्लिनचीट? ‘ईडी’मुळे साई रिसॉर्ट प्रकरण पुन्हा चर्चेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sai Resort case : the ED filed a chargesheet in the court but Shiv Sena (UBT) MLA Anil Parab has not been named as an accused in this case.
Sai Resort case : the ED filed a chargesheet in the court but Shiv Sena (UBT) MLA Anil Parab has not been named as an accused in this case.
social share
google news

ED chargesheet Anil Parab Money laundering case : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब हे सगळ्यात जास्त अडचणीत आल्याचं दिसलं, ते साई रिसॉर्ट प्रकरणात. ‘अनिल परब को हिसाब तो देना ही होगा’, म्हणत किरीट सोमय्यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरण लावून धरलं. वेळोवेळी या प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषदा घेतल्या आणि गंभीर आरोपही केले. आता त्याच रिसॉर्ट प्रकरणी ED ने आरोपपत्र दाखल केलंय. ईडीने दाखल केलेल्या या आरोपपत्रात मात्र अनिल परबांचंच नावं नाहीये. दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात परबांचं नाव नसल्यामुळे एक नवा ट्विस्ट निर्माण झालाय. यामुळे EDने अनिल परबांना दिलेला हा दिलासा आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झालाय. नेमकं हे प्रकरण काय आहे थोडक्यात जाणून घेऊयात… (Sai Resort case ED files chargesheet, Shiv Sena UBT’s Anil Parab not named as accused)

ADVERTISEMENT

अनिल परबांना वगळलं, कुणाची आहेत नावं?

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी साई रिसॉर्टचा मुद्दा उपस्थित करत अनिल परब यांच्यावर गैरव्यवहार केल्याचे आरोप केले. किरीट सोमय्यांनी साई रिसॉर्टच्या मुद्द्यावरून परबांना सतत घेरण्याचा प्रयत्न केला. याच काळात परबांमागे ईडीचा ससेमिरा लागला. अनिल देशमुख, संजय राऊत यांच्याप्रमाणे अनिल परबांनाही अटक होते की, काय अशी चर्चाही झाली.

हेही वाचा >> ’16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय फिरवू शकत नाही’, संजय राऊतांचं विधान

त्यांनंतर साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्यांनी सांगितलं. गेल्या अडीच वर्षांपासून परबांवर अनेक आरोप सोमय्यांकडून करण्यात आले. त्यामुळे अनिल परब अडकणार, अशी चर्चा सुरू होती. पण, आता ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अनिल परबांचं नावच नाहीये. यात नावं आहेत ती सदानंद कदम, उपविभागीय अधिकारी जयराम देशपांड़े आणि इतर चार जणांची. यामुळे ईडीने परबांना दिलासा दिल्याचं बोललं जातंय.

हे वाचलं का?

साई रिसॉर्ट प्रकरण… आरोपपत्रातील महत्त्वाचे मुद्दे…

साई रिसॉर्ट प्रकरणी अजूनही दापोली साई रिसॉर्ट प्रकरणाचा तपास सुरु.
-या प्रकरणी जयराम कदम आणि सदानंद कदम हे अटकेत आहेत.
-या प्रकरणी अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाने १२ जून पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलंय.

साई रिसॉर्ट प्रकरणी परबांवर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या वारंवार परबांना लक्ष्य करत आले आहेत. साई रिसॉर्टच्या खरेदी विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केलेला. सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर परब म्हणाले होते की, या प्रकरणी ईडीचा तपास सुरू आहे. माझा रिसॉर्टशी काहीही संबंध नाही. मी रिसॉर्टची जागा सदानंद कदम यांना विकली होती.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Pradeep Kurulkar : हनीट्रॅपमध्ये अडकलेले कुरूळकर RSS च्या शाखेत जायचे का?

आता या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये अनिल परबांचं नाव नाहीये. यामुळे ईडी पुरवणी आरोप आरोप पत्र दाखल करणार का? आणि जर पुरवणी आरोपपत्र दाखल केलं तर यात अनिल परबांचं नाव असेल का? याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT