Maratha Reservation : “फडणवीस सरकारने मराठा…”, संभाजीराजेंचं खासदारांना पत्र, लढा होणार तीव्र?
Sambhaji Raje Chhatrapati Latest News : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील खासदारांना एक पत्र लिहिलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात लिहिलेल्या या पत्रात नेमकं काय?
ADVERTISEMENT
Sambhaji Raje Chhatrapati Maratha Reservation : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे मोदी सरकारचे लक्ष वेधून संभाजीराजे छत्रपतींनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संभाजीराजेंनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदारांना महत्त्वाचं आवाहन केले आहे. (Sambhaji Raje Chhatrapati wrote letter to MPs from Maharashtra)
ADVERTISEMENT
संभाजीराजे छत्रपतींचे खासदारांना लिहिलेले पत्र जसेच्या तसे
प्रति,
मा. सर्व लोकसभा, राज्यसभा खासदार,
महाराष्ट्र राज्य
विषय : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील लोकसभा व राज्यसभा खासदारांची दिल्ली येथे एकत्रित बैठकीबाबत…
महोदय,
मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून संघर्ष करत आहे. यासाठी अनेक भव्य मोर्चे, आंदोलने, उपोषणे झालेली आहे. काही युवकांनी यासाठी आत्महत्या सारखा टोकाचा मार्ग निवडला. समाजाच्या भावना तीव्र आहेत. तरीही मराठा समाजाने आपली मागणी अतिशय शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने पुढे आणलेली आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Sukhdev Singh Gogamedi ची हत्या का? गँगस्टर रोहित गोदाराने केला खुलासा
मराठा समाजाच्या मागणीला प्रतिसाद देवून २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकारने तर २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कायदेशीर पातळीवर हे आरक्षण टिकले नाही.
मी स्वतः २००७ पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात सातत्याने जनजागृती करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवत काही आंदोलने स्वतः देखील केली आहे.
हेही वाचा >> बालमुकुंद ते ओतराम… भाजपच्या चार महंतांचं काय झालं?
राज्यसभा सदस्य असताना सभागृहात देखील हा विषय सविस्तर पणे मांडला होता. तसेच संसद परिसरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धरणे आंदोलन ही केले होते.
ADVERTISEMENT
मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी आंदोलन करत महाराष्ट्र दौरा करत आहेत. मराठा समाजाचे लाखो युवक हे देखील आंदोलनात सहभाग घेत आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ‘तुम्हाला बाथरूम सुद्धा उघडता येणार नाही’, मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा
या पार्श्वभूमीवर माझी आपणास कळकळीची विनंती आहे की याबाबत आपण हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी या नात्याने आवाज उचलणे आवश्यक आहे.
या विषयी लवकरच नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील सर्व लोकसभा, राज्यसभा खासदारांनी एकत्रित मराठा आरक्षण मिळवण्याबाबत ठोस भूमिका ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीचे सविस्तर निमंत्रण मी लवकरच आपणास पाठवेल.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत आणि समाजाला न्याय मिळावा हि विनंती.
-संभाजीराजे छत्रपती
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT