BMC Covid scam: संजय राऊतांना मोठा धक्का, ईडीकडून सुजित पाटकरांना अटक
कोव्हिड घोटाळा प्रकरणी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले सुजित पाटकर यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED) काल रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्यामुळे हा संजय राऊत यांच्यासाठी खूप मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: कोव्हिड घोटाळा प्रकरणी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले सुजित पाटकर यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED) काल रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्यामुळे हा संजय राऊत यांच्यासाठी खूप मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. यापूर्वी अनेकदा सुजीत पाटकर यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली होती. पण आता याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. (sanjay raut close aide sujit patkar and bmc doctor kishore bisure is a was dean of dahisar covid field hospital has been arrested by ed)
साधारण एक महिन्यापूर्वी ईडीने मुंबईत 15 ठिकाणी छापेमारी केली होती. ज्यामध्ये शिवसेना (UBT) पक्षाचे सचिव सूरज चव्हाण यांची देखील चौकशी झाली होती. त्याचबरोबर सुजीत पाटकर यांची देखील चौकशी झाली होती. त्यावेळेस अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांची देखील चौकशी झाली होती. महापालिकेतील खरेदी विभागातील अनेक अधिकाऱ्यांचीही चौकशी झाली होती. काही कंत्राटदारांची देखील चौकशी करण्यात आली होती.
त्याच प्रकरणात सुजित पाटकर यांना अटक करण्यात आली. याआधी सुजित पाटकर यांची ईडीने दोनदा चौकशी केली होती. आता ईडीकडून ही कारवाई अधिक तीव्र होताना दिसत आहे.
सध्या भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात खूप आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा अनेकदा आरोप हा विरोधकांकडून सत्ताधारी भाजपवर केला जात आहे.