Satara Accident : रक्षाबंधनासाठी निघालेल्या भावावर काळाचा घाला, रस्ते अपघातात झाला दुदैवी मृत्यू
Satara Accident Story : आदित्य साळुंखे हा तरूण रक्षाबंधनानिमित्त पल्सर मोटरसायकलवरून पोलादपूर, महाबळेश्वरमार्गे सातारला यायला निघाला होता. या दरम्यान त्याने इतका लांबचा प्रवास सुरक्षितपणे पार पडला होता. सातारा अवघ्या 24 किलोमीटर अंतरावर आला असताना त्याच्यावर काळाने घाला घातला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
साताऱ्याला बहिणीकडे निघालेल्या भावावर काळाचा घाला
रक्षाबंधनासाठी दुचाकीने निघालेल्या भावाचा अपघात
रस्ते अपघातात भावाचा जागीच मृत्यू
Satara Accident News : देशभरात उद्या रक्षाबंधन (Raksha Bandhan) साजरे केले जाणार आहे.या सणानिमित्त बहिण आणि भावामध्ये उत्साह आहे. अशात साताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत रक्षाबंधनासाठी बहिणीच्या घरी निघालेल्या भावाचा रस्ते अपघातात दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदित्य संजय साळुंखे (वय 23, करंजे, सातारा) असे या तरूणाचे (Boy Accident) नाव आहे. या घटनेने साळुंखे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (satara accident news brother going to satara for raksha bandhan on two wheeler accident shocking story)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य साळुंखे हा तरूण रक्षाबंधनानिमित्त पल्सर मोटरसायकलवरून पोलादपूर, महाबळेश्वरमार्गे सातारला यायला निघाला होता. या दरम्यान त्याने इतका लांबचा प्रवास सुरक्षितपणे पार पडला होता. सातारा अवघ्या 24 किलोमीटर अंतरावर आला असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. खेड येथून महाबळेश्वरमार्गे सातारला येत असताना मेढा बसस्थानकाजवळ अचानक आडव्या आलेल्या एसटीला दुचाकी धडकून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आदित्य साळुंखेचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : Video : मित्राशी बोलता बोलता अंगावर कोसळला AC,युवकाचा जागीच मृत्यू; हादरवून टाकणारा व्हिडिओ
रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास सातारा बाजूकडून आलेली एसटी बस स्थानकात जाण्यासाठी उजवीकडे वळली. त्यावेळी साताराच्या दिशेने येत असलेल्या आदित्यची मोटरसायकल अचानकपणे आडव्या आलेल्या एसटीवर आदळली. या अपघातात आदित्य गंभीर जखमी झाला. त्याचे हेल्मेटही तुटले.
हे वाचलं का?
या घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य बोलू शकत होता. त्याने आपल्या भावाला फोन करण्यास सांगितले. त्यावेळी त्याच्या घरच्यांना कळवतानाच लोकांनी जखमी आदित्यला मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. पण तो गंभीर जखमी असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला सातारला क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात हलवण्यास सांगितले. 108 क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावून त्याला सातारला हलवण्यात आले. मात्र दरम्यानच्या काळात त्याचा मृत्यू झाला होता.दरम्यान आदित्यच्या अपघाताची माहिती कळताच कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हे ही वाचा : Eknath Shinde : ''...म्हणून फडणवीसांच्या अटकेचा डाव रचला होता'', शिंदेंचा खळबळ उडवणारा गौप्यस्फोट
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT