Seema Haidar : पाकिस्तानी सीमा हैदरने नवऱ्याला सोडले अन् भारताच्या सचिनसोबत…, कहाणी काय?
नोएडाचा सचिन आणि दुसरी पाकिस्तानमधील सीमा हैदर जोडपं. प्रेमासाठी देशाच्या सीमा ओलांडून आलेल्या सीमा हैदरच्या अनेक कहाण्या आता चर्चिला जात आहेत.
ADVERTISEMENT

Seema Haider News : गेल्या काही दिवसांपासून देशात एका जोडप्याची खूपच चर्चा होतेय. हे जोडपं कोण याची कल्पना तुम्हाला आली असेल? तर हे आहे नोएडाचा सचिन आणि दुसरी पाकिस्तानमधील सीमा हैदर जोडपं. प्रेमासाठी देशाच्या सीमा ओलांडून आलेल्या सीमा हैदरच्या अनेक कहाण्या आता चर्चिला जात असून, ती सीमा ओलांडून भारतात का आली? हे सगळं खरंच प्रेमात होतं का? प्रेम आंधळं असतं का, आजच्या जगात असं प्रेम खरंच पाहायला मिळतं का? पाकिस्तानातील कराची येथून चार मुलांसह भारतात आलेल्या सीमाने सगळी कथाच सांगितली. (pakistani Seema Haider-sachin love story)
सीमा म्हणाली की, सचिनच्या प्रेमामुळेच मी इथे आले, मी तिथे एकटीच राहायचे. सीमाने पती गुलाम हैदरबद्दल सांगितले की, माझे पती जितके चांगले आहेत तितके चांगले नव्हते. अजिबात चांगलं नव्हते. लोकांनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये. सीमाने असंही सांगितलं की, लोक म्हणतात की मी इंग्रजी बोलते किंवा मी इतक्या लवकर इथल्या वातावरणात कशी रुळले? पण, मी काही लहान नाहीये. मी 27 वर्षांची आहे आणि मी चार मुलांना जन्म दिला आहे. चांगले काय आणि चूक काय ते मलाही समजते, असे तिने सांगितले.
सीमा हैदर म्हणते, मला खंत नाही
भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध तुला माहिती असेल. दोन्ही देशात कसा तणाव असतो. तरीही चार मुलांसह एका अनोळखी देशात निघून आलीस, हा धोका का पत्करला? या प्रश्नावर सीमा हैदर म्हणाली, धोका पत्करावाच लागला. दोनच मार्ग होते, तिथे राहुन रडण्यापेक्षा इथे येण्यासाठी प्रयत्न करणे.
वाचा >> Seema Haider: प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे ‘हे’ व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का? पतीसोबत…
सीमा म्हणाली की, निदान असं तर नाही ना की मी प्रयत्न केले नाही. नाहीतर सचिनकडे जाण्यासाठी प्रयत्न केला नाही याचा मला आयुष्यभर पश्चाताप झाला असता. मी प्रयत्न केला आणि यशस्वी झाले. मला आधी भारतीय व्हिसा घेऊन यायचे होते, पण तो मिळू शकला नाही, म्हणून मला हा मार्ग पत्करावा लागला, असंही तिने सांगितलं.