Video : तब्बल 7 मुलांचा दुचाकीवरून प्रवास, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घडवली अद्दल

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Activa Scooty Viral Video : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात, काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खूपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत मुंबईच्या (Mumbai) रस्त्यांवर एक दुचाकीस्वार 7 मुलांचा स्कुटीवर घेऊन गाडी चालवत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्याने कॅमेरात कैद करून मुंबई पोलिसांना (Mumbai Police) ट्विटरवर टॅग केला होता. यानंतर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला अटक केली आहे. तसेच आरोपीविरोधात कलम 308 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(seven children on activa scooty mumbai traffic police challan arrested video viral in social media)

मुंबईच्या रस्त्यावर एक दुचाकीस्वार सात मुलांना स्कुटीवर बसवून प्रवास करत होता. ही सातही मुले खुपच लहान होती. या मुलांना ट्युशनला सोडण्यासाठी दुचाकीस्वाराने सर्वांना स्कुटीवर बसवले होते आणि जीवघेणा प्रवास करत होता. मुबंईच्या रस्त्यावरचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिड़िओ त्याच रस्त्यावर गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ मुंबई पोलिसांनी टॅग करून कारवाईची मागणी केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मुनव्वर शाहला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकल्या मुलांचा जीव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास करणाऱ्या आरोपीचे नाव मुनव्वर शाह आहे. मुनव्वर शाह हा नारळाचे दुकान चालवतो. तसेच व्हायरल व्हिडिओत स्कुटीवर मुनव्वर शाहसोबत 7 लहान मुले बसली आहेत. या सात मुलांमधील चार मुले ही मुनव्वरची आहेत, तर इतर तीन मुलेही शेजाऱ्यांची आहे. आरोपी हा या मुलांना ट्युशनला सोडायला जात होता. यावेळी मुंबईच्या रस्त्यावर 7 मुलांना घेऊन स्कुटीने प्रवास करताना एका व्यक्तीने मुन्नवरचा हा व्हिडिओ कॅमेरात कैद केला होता. हा व्हिडिओ ताडदेव पोलीस ठाणे हद्दीतला असल्याची माहिती आहे. त्याचसोबत 21 चे 24 जून दरम्यानचा हा व्हिडिओ आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संबंधित नागरीकाने हा व्हिडिओ मुंबई पोलिसांना टॅग केला होता. यानंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली होती. आणि पोलिसांनी या घटनेचा तपास करून मुन्नवर शाहला अटक केली होती. सध्या आरोपीविरोधात कलम 308 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपासही सुरु आहे.

बाईकवर 2 मुलींसोबत स्टंट

दरम्यान आधी मुंबई पोलिसांनी दोन मुलींना बाईकवर बसून स्टंट करणाऱ्या एका तरूणाला अटक केली होती.सोशल अॅक्टीविस्ट मुश्ताक अंसारीने ट्विटर हा व्हिडिओ शेअऱ केला होता. Pothole warriors नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून मुश्ताक अंसारी यांनी एक व्हिडिओ शेअऱ करून मुंबई पोलिसांना टॅग केला होता. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केला होता. या व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येऊन फैयाज कादरी नावाच्या आरोपीला अटक केली होती. या आरोपीने दोन मुलींना बाईकवर बसवून स्टंट करून व्हिडिओ व्हायरल केला होता. बीकेसी पोलिसांनी या आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT