Sharad Pawar : ‘राम दर्शनासाठी अयोध्येला येईन, पण…’; पवारांनी भूमिका केली जाहीर

भागवत हिरेकर

शरद पवार यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार देताना काँग्रेससारखी भाजप, आरएसएस विरोधात भूमिका न घेता वेगळ्या मार्गाने मत मांडलं आहे.

ADVERTISEMENT

Sharad Pawar has refused to attend the Ram Mandir Pran Pratishta program in Ayodhya.
Sharad Pawar has refused to attend the Ram Mandir Pran Pratishta program in Ayodhya.
social share
google news

Sharad Pawar on Ram Mandir Pran Pratishtha : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रमुखांना आणि इतर नेत्यांनाही आमंत्रणं देण्यात आली आहेत. काँग्रेसने सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही, याबद्दल शरद पवारांनी भूमिका मांडली आहे.

शरद पवारांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात शरद पवार यांनी अयोध्येला येण्याच्या दौऱ्याबद्दल माहिती दिली असून, सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

काँग्रेसची भाषा शरद पवारांनी टाळली

राम मंदिरातील सोहळ्याला जाण्याबद्दल शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. पवारांनी या मुद्द्यावर भूमिका मांडतांना काँग्रेसची भाषा टाळली. काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर भाजपने टीका केली. त्याचबरोबर काँग्रेसमधील नेत्यांनीही पक्षश्रेष्ठीच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

काँग्रेसने सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार देताना म्हटले होते की, “भगवान रामांची पूजा कोट्यवधी भारतीय करतात. धर्म हा माणसाचा व्यक्तिगत विषय आहे. पण, भाजप आणि आरएसएसने वर्षांपासून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा राजकीय बनवला आहे. त्यामुळे स्पष्ट आहे की अर्धवट काम झालेल्या मंदिराचं उद्घाटन केवळ निवडणुकीत लाभ घेण्यासाठीच केले जात आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp