कल्याण मतदारसंघ, खासदार श्रीकांत शिंदे अन् भाजप मंत्र्याची भलतीच गुगली
कल्याण लोकसभा मतदारासंघात श्रीकांत शिंदे यांच्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये गेले काही दिवस धूसफूस सुरू होती. मात्र, याचविषयी भाजप मंत्री रवींद्र चव्हाण यांनी वेगळीच भूमिका घेत सर्वांना अवाक् केलं आहे.
ADVERTISEMENT
कल्याण: कल्याण (Kalyan) लोकसभेतील शिवसेना-भाजपाचा (Shivsena-BJP) वाद हा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, आता यात नवीन ट्विट्स आला आहे. भाजपाच्या (BJP) स्थानिक आमदारांनी कोणता वाद होता? आणि तो कधी मिटला? असं विधान करत नवी गुगली टाकली आहे. आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या या विधानामुळे वरिष्ठ पातळीवर कल्याण-डोंबिवलीमधील शिवसेना-भाजपा वादावर चर्चा होऊन त्यावर ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप ” असंच काहीसं ठरलं की काय? असं म्हणणं वावगं ठरणार नाही. (shiv sena bjp srikant shinde kalyan lok sabha constituency minister ravindra chavan surprising statement political news of maharashtra)
ADVERTISEMENT
कल्याण लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. एका महिलेने भाजपा पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप केल्यानंतर सेना-भाजपामध्ये वादाची ठिणगी पडली. पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीवरून ते थेट ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागेवरून दोन्ही पक्षात जुंपली. इतकंच नाही तर भाजपाने बैठक घेत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव केला. यावेळी डोंबिवलीचे भाजपाचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते.
हे ही वाचा >> ‘मी मुद्दाम मेहबुबा मुफ्तीच्या बाजूला बसलो..’, उद्धव ठाकरेंनी सगळंच सांगून टाकलं!
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)थेट राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. तर दुसरीकडे ‘देवेंद्र फडणवीस सिर्फ नाम ही काफी है’, अस म्हणत भाजपनेही शक्ती प्रदर्शन केलं होतं. मात्र, आता चव्हाण यांनी कोलांटउडी घेतली असल्याचं दिसून आलं आहे.
हे वाचलं का?
मंत्री रवींद्र चव्हाणांची राजकीय गुगली
भाजपाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांनी कल्याण लोकसभेतील सेना आणि भाजपाचा वाद मिटला आहे का? असा प्रश्न विचारला. यावेळी कोणता वाद होता आणि तो कधी मिटला? याबद्दल मला माहित नाही असं विधान चव्हाण यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
भाजप पक्ष आणि भाजप कार्यकर्ते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून येण्यासाठी देशात एनडीएचा उमेदवार जिंकला पाहिजे या उद्देशाने संघटनात्मक रचना करण्यासाठी झटत आहे. असंही चव्हाण म्हणाले. शिंदे आणि फडणवीस सरकार जनहिताच्या दृष्टीने काम करत आहेत. कोण काय बोललं? कोणी काय केलं? यापेक्षा आम्ही आमचं सरकार सामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टीने काम करताना दिसतंय हे महत्वाचं आहे. चव्हाण यांच्या विधानामुळे ठाणे जिल्ह्यात आणि विशेषतः कल्याण-डोंबिवली शहरात पुन्हा शिंदे आणि चव्हाण यांच्यामधील राजकीय म्युच्युअल अंडरस्टँडिंग पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Devendra Fadnavis: ‘घरात घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायलाही..’, फडणवीस ठाकरेंवर संतापले
◆ ऑपरेशन लोटस ते शिंदेंची बंडखोरी याचे साक्षीदार असलेले डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना ऑपरेशन लोटस ते शिंदेंची बंडखोरी यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी “भारत माता की जय” म्हणून बोलणं टाळत पत्रकार परिषद आटोपती घेतली.
◆ मोदी @9 या जनसंपर्क अभियानाच्या एक भाग म्हणून प्रत्येक लोकसभा मतदारसंघांमध्ये एक जनसभा घेण्याच्या दृष्टीने केंद्रीय नेतृत्वाने निर्देश दिले. त्यामुळे अंबरनाथ मधील शिवमंदिर परिसरात रविवारी संध्याकाळी चार वाजता भाजपच्या वतीने जनसभेचे आयोजन केले आहे. कल्याण लोकसभेमध्ये असणाऱ्या सहा विधानसभेमध्ये असणाऱ्या जवळजवळ 1,900 पेक्षा जास्त बुथवरील भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक ताकद आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT