Wagh Nakh : संभाजीराजेंची उडी, ‘त्या’ वाघनखांबद्दल समोर आणला मोठा पुरावा

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

shivaji maharaj wagh nakh : sambhajiraje chhatrapati shared evidence of wagh nakh.
shivaji maharaj wagh nakh : sambhajiraje chhatrapati shared evidence of wagh nakh.
social share
google news

Shivaji Maharaj Wagh Nakh : लंडनमधील म्युझियममध्ये असलेली वाघनखं महाराष्ट्रात परत आणली जाणार आहेत. तीन वर्षांसाठी ही वाघनखं आणली जाणार असली, तरी त्यावर मोठा ऐतिहासिक वाद सुरू झाला आहे. काही इतिहास संशोधकांनी ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे सरकार मात्र ही वाघनखं तीच असल्याचा दावा करत आहे. यात आता संभाजीराजे छत्रपतींनी उडी घेतली आहे. वाघनखांबद्दल मोठा पुरावा संभाजीराजेंनी दिला आहे. त्याचबरोबर सरकारलाही सल्ला दिला आहे.

ADVERTISEMENT

लंडनमधील वाघनखांवरून वाद सुरू आहे. यात आता संभाजीराजे छत्रपतींना महत्त्वाचा पुरावा समोर आणाला आहे.

समजून घ्या >> लंडनमधील ‘ती वाघनखं’ खरंच शिवाजी महाराजांनी वापरलेली, काय आहे सत्य?

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “लंडन येथील संग्रहालयात असणारे वाघनखे महाराष्ट्रात तीन वर्षांच्या मुदतीवर प्रदर्शनासाठी आणले जात आहे.”

हे वाचलं का?

ती वाघनखं असण्याची शक्यता…

संभाजीराजे पुढे म्हणाले की, “हे वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधावेळी वापरले असल्याचा दावा राज्य सरकार करत आहे, मात्र अनेक इतिहास तज्ञांनी त्यामध्ये दुमत व्यक्त केले आहे. २०१७ साली मी याठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी तिथे लिहिलेल्या माहिती फलकावर केवळ तशी “शक्यता” असल्याचे लिहिलेले पाहण्यात आले होते. सरकारने या विषयावर सर्व विचारधारेच्या इतिहास तज्ञांशी चर्चा करून एकमताने मार्ग काढावा”, असा सल्ला संभाजीराजेंनी शिंदे सरकारला दिला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Nanded Hospital : ‘तीन पक्ष ठणठणीत बाकी महाराष्ट्र…’; राज ठाकरे कडाडले

“मात्र, सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी भेट म्हणून दिलेल्या या वाघनखांस ऐतिहासिक मूल्य आहे, हे कुणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे आपल्या इतिहासाशी निगडीत ऐतिहासिक महत्त्व असणारे हे वाघनख केवळ तीन वर्षांच्या मुदतीवरच आणले जात आहे व मुदत संपल्यावर ते इंग्लंडला परत करावे लागेल, हे वेदनादायी आहे. त्यामुळे सरकारने हे वाघनख कायमस्वरूपी त्याच्या मूळ ठिकाणी, म्हणजेच महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न करणे अधिक गरजेचे आहे”, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपतींनी मांडली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT