Skin Care Tips : ‘या’ महिला टाईट स्किनसाठी पितात खास चहा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

skin care tips secreat drinks in this to reduce fine lines and wrinkles beauty tips
skin care tips secreat drinks in this to reduce fine lines and wrinkles beauty tips
social share
google news

प्रत्येक महिलेला सुंदर दिसाव असे वाटत असते. यात काही महिला अपवादही ठरू शकतात. मात्र सुंदर दिसण्यासाठी महिला तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न करत असतात. तोंडाला हळद लावतात, घरगूती फेसपॅक बनवतात, कोरफड लावतात, अशा ना ना तऱ्हेचे प्रयत्न करत असतात. पण कोरीयातल्या तरूणी मात्र सुंदर दिसण्यासाठी वेगळीच ट्रीक वापरतात. या महिला सुंदर दिसण्यासाठी खास पद्धतीचा चहा पितात, हा चहा कसा बनवला जातो? व या महिला स्वत: ला सुंदर कशा ठेवतात, हे जाणून घेऊयात. (skin care tips secreat drinks in this to reduce fine lines and wrinkles beauty tips)

ADVERTISEMENT

कोरीयन तरूणी या दिसायला खूप सुंदर असतात. मात्र त्या त्यांची सुंदरता कायम ठेवण्यासाठी बोरी टी (Bori Tea) किंवा बार्ली टी (Berly Tea)चे सेवन करतात. हा एक साधारण पद्धतीचा काढा आहे. तसेच हा काढा कोरीयन संस्कृतीचा एक अभिन्न अंग आहे. या चहाचे सेवन केल्याने त्वचेचे पोषण तर होतेच शिवाय त्वचेमध्ये तजेलदरपणा देखील येतो. त्यामुळे जर तुम्हाला देखील सुंदर दिसायचे असेल तर तुम्ही बोरी चहाचे सेवन करू शकता.

हे ही वाचा : Pune : ‘मुलाचं निधन झालंय, डीजे वाजवू नका’, 21 जणांनी अवघ्या कुटुंबाला केली बेदम मारहाण

बार्लीची चहा कशी बनवाल?

साहित्य : एक कप बार्लीचे दाने
4-6 कप पाणी

हे वाचलं का?

चहा अशी बनवाल?

  • बार्लीचे दाणे कोरड्या पॅनमध्ये ठेवा आणि गॅस कमी ठेवून ती 5-7 मिनिटे भाजून घ्या.
  • जिथपर्यंत हे दाणे गोल्डन ब्राऊन रंगाचे होत नाही, तिथपर्यंत ते भाजत राहा.
  • आता एका टोपात पाणी गरम करून घ्या आणि त्यात हे दाणे टाका.
  • आता कमी गॅसवर हे दाणे 15 मिनिटे उकळू द्या.
  • आता भांडे गॅसवरून काढा आणि चहा एका किटलीमध्ये गाळून घ्या.
  • आता तुमच्या पसंतीनुसार, गरम, थंड अथवा गोड किंवा बिना साखरेचा तुन्ही पिऊ शकता.

बार्लीच्या चहामध्ये क्वेर्सेटिन आणि कॅटेचिनसह अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात. यामुळे ना तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा बारीक रेषा दिसणार नाहीत. आणि तुम्ही तरूण दिसाल.

हे ही वाचा : छोट्या भावावर वडिलांचा जास्तच जीव, संतापातून मोठ्या भावाने…, कुटुंब हादरलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT