Sushma Andhare : ‘शिवसेनेचं चिलखत…’, संजय राऊतांना अंधारेंचं भावूक पत्र, वाचा जसंच्या तसं

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

sushma andhare wrote letter to sanjay raut on his birthday, andhare praised his courage.
sushma andhare wrote letter to sanjay raut on his birthday, andhare praised his courage.
social share
google news

Sushma andhare letter to sanjay sanjay Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त उपनेत्या सुषमा अंधारेंनी पत्र लिहिलं. संजय राऊतांविषयी आदर व्यक्त करताना सुषमा अंधारे भावूक झाल्या. ‘आपला वाढदिवस हा निष्ठावंत शिवसैनिकासाठी निष्ठा दिवस आहे’, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. पत्रात अंधारेंनी ट्रोलर्सचाही समाचार घेतला आहे. (sushma andhare wrote emotional post for sanjay raut on his birthday)

ADVERTISEMENT

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी संजय राऊतांना लिहिलेलं पत्र

सन्माननीय संजय राऊत सर

शिवसेनेचे चिलखत…
आपला वाढदिवस हा निष्ठावंत शिवसैनिकांसाठी “निष्ठा”दिवस आहे!

हे वाचलं का?

लोकशाहीची प्रचंड आसक्ती असणारा माणूस सभोवतालची बेबंदशाही, हुकूमशाही झुगारून जिवाच्या आकांताने लढतो. त्याची लढाई येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या सुरक्षित भवितव्याची चिंता आणि आशंका मांडते.

हे ही वाचा >> काका-पुतण्या एका फ्रेममध्ये, दिवाळी पाडव्याच्या रात्री बारामतीत काय घडलं?

ही समष्टीची लढाई म्हणजे हुकूमशाही विरोधातला विद्रोह जणू. पण ज्यांना हा विद्रोह कळत नाही, जे समजून उमजून सोयीस्कररित्या आपला स्वार्थ साधण्यासाठी मौन बाळगतात. अशांसाठी कविश्रेष्ठ नामदेव ढसाळ दादा जे बिरूद वापरतात ते योग्यच. पण, सत्तेसाठी जी हुजुरी करणारे, प्रसंगी आपल्या पाठीला रबर नाही कणा आहे, हे विसरणारे मात्र मग थयथयाट करतात. जसा गद्दारांवर आपण केलेल्या हल्ल्यानंतर काल काहींनी थयथयाट केला.

सर, माझ्यासाठी आपण कायम कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती… सगळ्यांना सांभाळून घेणारा मोठा भाऊ असे वाटत राहिलात. पक्षप्रवेशनांतर आपल्याला भेटायचे तोच सूड भावनेतून झालेल्या ED च्या कारवाईमुळे आपल्याला भेटता आले नाही.

ADVERTISEMENT

आपल्या गैरहजेरीत माझ्या परीने खिंड लढवण्याचा प्रयत्न केला, पण आपला अत्यंत लढाऊ आणि कर्तबगार असा मोठा भाऊ काही काळासाठी सोबत नाही, ही उणीव आम्हाला अधिक जबाबदारीने वागण्याचे भान देत होती. सामनाच्या संपादकीय मधला रोखठोक बाणा आपल्या वागण्या जगण्यातही आहे. हे आपले टीकाकार ही अमान्य करणार नाहीत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> रामदास कदमांनी घेतली शिंदेंची भेट, कीर्तिकरांबाबत मोठं विधान

सर, ज्यांना बहीण-भाऊ किंवा बाप-लेक अशी नातीच ज्ञात नाहीत किंवा त्यांच्या घरात तसे संस्कारच शिकवले नाहीत, असे तद्दन बौद्धिक दिवाळखोर जेव्हा त्यांच्या कुटुंब, संघटना तथा नेतृत्वाच्या संस्काराचा विकृत परिचय देतात… अधून मधून जेव्हा ट्रोलिंग,दबावतंत्र यामुळे माझे कुटुंबीय अस्वस्थ होते, तेव्हा आम्ही आपला-आपल्या कुटुंबाचा त्यांनी मधल्या काळात जे दिव्य सोसलं त्याचा विचार करतो अन् मग कळतं, अरेच्या वर्षावहिनी किंवा तुमच्या आईने जे सोसलं त्यापुढे हे काहीच नाही.

मध्ये नीलम गोऱ्हे आपली उपसभापती पदाची खुर्ची वाचवण्यासाठी गद्दारी करुन गेल्या. पण, आपल्या गद्दारीचे लंगडे समर्थन करताना मला राऊतांचे बोलणे पटत नव्हते, असे सांगितले तेव्हा मात्र निष्ठावान शिवसैनिकांनी गोऱ्हे नावाचा शेवटचा बेईमान चिरा निखळला म्हणून आनंदच व्यक्त केला, हे उल्लेखनीय आहे.

हे ही वाचा >> ‘शरद पवारांच्या गाडीत…’, कीर्तिकरांनी सांगितला कदमांच्या गद्दारीचा इतिहास

सर, ज्या त्वेषाने आपण गद्दार गँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दांभिकतेवर तुटून पडताय, जिवाच्या आकांताने हा मातोश्रीचा गढ वाचवण्यासाठी निकराची झुंज देत आहात ती केवळ अतुलनीय आहे. लावारिस पेड ट्रोलर्स, स्लीपर सेलमधले गद्दार, एवढं धमकावून ही हा बधत कसा नाही, हा विचार करुन हार मानणारी शाऊटिंग ब्रिगेड अन् मातोश्रीने भरभरून दिल्यावरही बेईमान होणारे स्वार्थी नेते या सगळ्यांना आपण तोंड देत आहात.

आपला ऊर्जास्व लढा फलद्रूप होवो, या सदिच्छासह पुनश्च एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

आपली लहान बहीण
सुषमा अंधारे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT