साताऱ्यातील जवानाचा संशयास्पद मृत्यू, पंजाबमधील सैन्य तळावर नेमकं काय घडलं?

इम्तियाज मुजावर

पंजाबमधील सैन्य तळावर झालेल्या गोळीबारात साताऱ्यातील जवानाचा मृत्यू हा दहशतवादी हल्ल्यातील नसून आपआपसातील कलहामुळे झाल्याचं सध्या बोललं जात आहे. याबाबत लष्कराकडून उच्चस्तरीय चौकशी देखील केली जात आहे.

ADVERTISEMENT

suspicious death of a jawan in satara in firing at an army base in punjab
suspicious death of a jawan in satara in firing at an army base in punjab
social share
google news

सातारा: पंजाबच्या भठिंडा जिल्ह्यातील सैन्य तळावर (Army Base) 12 एप्रिल बुधवारी गोळीबाराचा प्रकार घडला. यात दुर्दैवाने चार जवानांना प्राण गमवावे लागले. यातच साताऱ्यातील (Satara) जावळी तालुक्यामधील करंदोशी येथील जवान तेजस मानकर याचा या गोळीबारात संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. सैन्य दलाचे अधिकारी मेजर भट्टाचार्य यांनी जावळी तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांना केलेल्या मेलनुसार जवान तेजस मानकर यांचे पार्थिव शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी दुपार पर्यंत त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. (suspicious death of a jawan in satara in firing at an army base in punjab)

वृत्तसंस्था मधील प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार सैन्य दलातील परस्परातील मतभेदामुळे गोळीबार झाल्याचा पंजाब पोलिसांचा व सैन्य दलातील पोलिसांचा संशय आहे.

नेमकं प्रकरण काय?

एशियन न्यूज वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार संबंधित गोळीबार हा दहशतवादी घटना नसल्याचे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या घटनेवर हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने निगराणी केली जात आहे.

अधिक वाचा- Pune: मुलीने दिलेल्या नकारामुळे नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या, पुण्यात नेमकं काय घडतंय?

याप्रकरणी काही संशयितांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित सैन्य तळावर बाहेरून आलेल्या व्यक्तीने हा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे. परस्परांमधील मतभेदामुळे जवान मरण पावले असल्याचे काही वृत्तामध्ये प्रसिद्ध झाले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp