Sharad Pawar : "ही झुंडशाही...", निखिल वागळेंवरील हल्ल्यानंतर पवार संतापले
Sharad Pawar Latest News : शरद पवार यांनी निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर संताप व्यक्त केला. त्याचबरोबर या झुंडशाही प्रवृत्तीला पुण्यातील आणि महाराष्ट्रातील जनताच धडा शिकवेल, असेही ते म्हणाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
निखिल वागळेंवर पुण्यात हल्ला
शरद पवारांची राज्य सरकारवर टीका
सरकारला म्हणाले झुंडशाही प्रवृत्तीचं सरकार
Sharad Pawar nikhil wagle : पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासह असीम सरोदे आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. पुण्यात घडलेल्या या घटनेनंतर शरद पवारांनी संताप व्यक्त केला. (Sharad Pawar First Reaction on attack on Nikhil Wagle)
शरद पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना निखिल वागळेंवर झालेल्या हल्ल्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर भूमिका मांडताना पवारांनी राज्यकर्त्यांना इशारा दिला.
शरद पवार म्हणाले, झुंडशाही प्रवृत्तीला जनताच...
पुण्यात निखिल वागळे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. राज्यात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. तुम्ही याकडे कसं बघता, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, "पुण्यामध्ये एका जाणकार व्यक्तीवर हल्ला केला गेला. त्याच्या गाडीवर हल्ला केला गेला. गाडीच्या काचा फोडल्या. याचा अर्थ असाच आहे की, आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ इच्छितात. ही झुंडशाही लोकांना पटणारी नाही."










