Eknath Shinde:’…याचे नाटक निदान यापुढे तरी करू नका’, शिवसेना (UBT) शिंदेंवर का भडकली?
कळवा रुग्णालयात 27 रुग्णांचा मृत्यू झाला. यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केलीये. एकनाथ शिंदेंवरही तिखट शब्दात टीका केलीये.
ADVERTISEMENT

Kalwa Hospital : ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तब्बल 27 रुग्णांचा मृत्यू झाला. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धारेवर धरले. त्यावर शिंदे म्हणाले की, राजकारण करू नका. शिंदेंच्या याच भूमिकेवरून शिवसेनेने (युबीटी) त्यांना लक्ष्य केलंय. नाटक करून नका, असा चिमटा काढतानाच शिवसेनेने आरोग्य मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केलीये.
10 ऑगस्ट रोजी 5, तर 13 ऑगस्ट रोजी तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी 4 रुग्ण कळव्यातील रुग्णालयात दगावले. या घटनेनं खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात भेट दिली आणि विरोधकांना राजकारण न करण्याचे आवाहन केले. पण, यावर शिवसेनेने तिखट प्रतिक्रिया दिलीये.
सामनात प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात सुरुवातालीच एकनाथ शिंदेंना खडेबलो सुनावेलत. “13 ऑगस्टच्या रविवारी एका रात्रीत या रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्युकांडाने महाराष्ट्राला हादरे बसले, पण ठाणे-कळवा ज्यांचे ‘होम ग्राऊंड’ आहे त्या मुख्यमंत्र्यांना ते जाणवायला बहुदा दोन दिवस लागले.”
वाचा >> शरद पवारांना मोठी ऑफर? काँग्रेस, शिवसेना (UBT) टेन्शनमध्ये, काय शिजतंय?
“सोमवारी (14 ऑगस्ट) रात्री त्यांचे पाय कळवा रुग्णालयाला लागले. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्याने ते म्हणे महाबळेश्वर येथे आराम घेत होते. तुम्ही तुमच्या प्रकृतीस जपा, हवा तिथे, हवा तेवढा आराम करा, पण आपण जनतेच्या मदतीला कसे लगेच धावून जातो याचे नाटक निदान यापुढे तरी करू नका”, असे खडेबोल अग्रलेखातून शिवसेनेने सुनावलेत.