चिकन टिक्का मसाला पिझ्झा खाल्ला अन् जीवच गेला, तरूणासोबत काय घडलं?
खरं तर जेम्स हा इंटरनेटवरून फुड मागवताना नेहमी इंग्रीडिएंट सर्च करूनच मागवायचा. मात्र पिझ्झा मागवताना तो इंग्रीडिएंट विचारायला विसरला. त्यामुळे हा पिझ्झा त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.
ADVERTISEMENT
जगभरातील अनेक लोकांना पिझ्झा खायला आवडतो. काही लोक हाच पिझ्झा इतका चवीने खातात की दोन वेळचे जेवत देखील नाही, अशी परिस्थिती आहे. अशाच पिझ्झा लव्हर्ससाठी ही बातमी खुप महत्वाची आहे. कारण या घटनेत पिझ्झा खाल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे तरूणाने पिझ्झाचा एक संपूर्ण तुकडा देखील खाल्ला नाही त्याआधीच त्याचा जीव गेला आहे. आता तरूणाच्या मृत्यूने त्याच्या मित्रांना हादरा बसला आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. (viral story man died after eating chicken tikka masala pizza due to allergy of peanuts shcoking story)
ADVERTISEMENT
डेली स्टार रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंड लीड्सचा रहिवासी असलेल्या 23 वर्षीय जेम्स स्टुअर्ट एटकिंसन या तरूणाने ऑनलाईन चिकन टिक्का मागवला होता. हा पिझ्झा खाताना त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांने पिझ्झाचा एक संपूर्ण तुकडा देखील खाल्ला नव्हता त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. जेम्स एटकिंसनच्या या मृत्यूने त्याच्या कुटुंबिय आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना 1O जुलै 2020 रोजी घडली आहे.
हे ही वाचा : Eknath Shinde : “बाळासाहेबांनंतर शिवसेनेत…”, CM शिंदेंनी व्यक्त केली खदखद
कसा झाला मृत्यू?
खरं तर जेम्स हा इंटरनेटवरून फुड मागवताना नेहमी इंग्रीडिएंट सर्च करूनच मागवायचा. मात्र पिझ्झा मागवताना तो इंग्रीडिएंट विचारायला विसरला. त्यामुळे हा पिझ्झा त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. कारण जेम्सला 2010 पासून शेंगदाण्याची अॅलर्जी होती. आणि त्याने मागवलेल्या या पिझ्झात शिंगदाणा होता. या शिंगदानाचा त्याच्या मृत्यूचे कारण ठरला आहे.
हे वाचलं का?
मेडिकल रिपोर्टमध्ये काय?
जेम्सने पिझ्झा मागवला आणि फक्त त्याचा एकच तुकडा घशात टाकला. त्यानंतर अचानक त्याची प्रकृती खालावली. मित्रांना ही घटना कळताच त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका मागवली होती. मात्र रुग्णावाहिका पोहोचण्याआधीच त्याला मृत्यूने कवटाळले होते.
हे ही वाचा : Sharad Mohol Murder : शरद मोहोळ खून प्रकरणात पिस्तूल पुरवणारे ‘ते’ दोघे कोण?
पॅथॉलॉजिस्ट जेनिफर बोल्टन यांनी सुनावणीला सांगितले की, जेम्सने खालेल्या पदार्थाची तपासणी केली असता त्यात शेंगदाणे आढळले होते. आणि ज्या व्यक्तीला शेंगदाण्याची ऍलर्जी आहे, त्याच्या शरीरावर नकारात्मक परिणाम करतील इतके पुरेसे शिंगदाने या पिझ्झामध्ये होते. इतकंच नाही तर वैद्यकीय तपासणीदरम्यान जेम्सच्या पोटात शेंगदाण्याचे तुकडेही आढळून आले आहेत. त्यामुळे त्याचा मृत्यू हा पिझ्झातील शेंगदाण्यामुळे झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT