Maratha kranti morcha:’आता आम्हाला गोळ्या घाला, आरक्षण हे घेणारच’, सरकारला नेमका इशारा कोणाचा..?
Maratha Andolan Jalna : मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलनकर्ते मनोर जरांगे-पाटील यांच्यासह लोकांवर लाठीचार्च करण्यात आल्यानंतर मात्र आता वातावरण चिघळले आहे.
ADVERTISEMENT
Maratha Andolan Jalna : जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाला तीन दिवस झाले होते, त्यामुळे त्यांची प्रकृती खालवली, त्यानंतर त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली. मात्र त्यानंतर त्यांना जबरदस्तीने उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांनी आंदोलनावर लाठीचार्च केल्यानंतर मात्र आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितेल की, शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारचे हे अपयश असून पोलिसांनी केलेला लाठीहल्ला हा या सरकारला लागलेला डाग असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. (we are shot, we will take Maratha reservation, warns manoj jarange patil to maharashtra government)
ADVERTISEMENT
मला तुम्ही गोळ्या घाला
मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला इशारा देत ते म्हणाले की, गोळ्या घातल्या तरी मी हे आरक्षण घेणारच असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. यावेळी या सरकारने अंतर्वली सराटी गावात घुसवलेले पोलीस थांबवा अशी त्यांनी विनंतीही त्यांनी केली आहे.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis : ‘…आघाडीची भेंडी झाली’, फडणवीसांनी काढले विरोधकांचे वाभाडे
मोगलांनी मारले नाही पण तुम्ही….
मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढविला आहे. यावेळी त्यांनी सरकारवर गंभीर आरोपही केले आहेत. आम्हाला मोगलाईने मारले नाही, इंग्रजांनी मारले नाही, मात्र तुम्ही माझ्या गावातील माता-माऊलींवर लाठीचार्ज करुन त्यांना मारहाण करायला लावला असा गंभीर आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Jalna लाठीहल्ला, ‘गृहमंत्र्याच्या मनातील भावना हीच पोलिसांची कृती’ शरद पवारांचा आरोप
अंगात शक्ती नसतानाही
माझ्या अंगात शक्ती नसतानाही आणि मला उठताही येत नसताना माझ्यावर जर तुम्ही लाठीचार्ज करायला लावता तर तो तुमच्यावर सगळ्यात मोठा डाग असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. त्यामुळे आता तुम्ही आम्हाला गोळ्या घातला तरीही आम्ही हे आरक्षण घेणारच असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT