चंद्र, सूर्यानंतर ISRO चे गगनयान झेपवणार! काय आहे नवं मिशन?
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी शनिवारी (2 सप्टेंबर) आदित्य-L1 च्या यशस्वी प्रक्षेपणाचं कौतुक केलं आणि पुढचं मिशन गगनयानबद्दल सांगितलं. ते म्हणाले, गगनयानची पुढील चाचणी ऑक्टोबरमध्ये होऊ शकते.
ADVERTISEMENT
ISRO’s Gaganyaan Mission : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी शनिवारी (2 सप्टेंबर) आदित्य-L1 च्या यशस्वी प्रक्षेपणाचं कौतुक केलं आणि पुढचं मिशन गगनयानबद्दल सांगितलं. ते म्हणाले, गगनयानची पुढील चाचणी ऑक्टोबरमध्ये होऊ शकते. आदित्य L1 चे लॉन्चिंग हा भारतासाठी आनंदाचा क्षण असल्याचं सांगत राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीहरिकोटाचे दरवाजे उघडल्यामुळे हे शक्य झालं आहे.’
ADVERTISEMENT
ऑक्टोबर महिन्यात गगनयानची उड्डाण चाचणी!
राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, ‘भारतासाठी हा आनंदाचा क्षण आहे. आणि दुसरं म्हणजे, चांद्रयानाप्रमाणे इथेही संपूर्ण देशाचा सहभाग होता. पंतप्रधान मोदींनी श्रीहरिकोटाचे दरवाजे उघडल्यामुळे हे शक्य झालं आहे. त्यांनी या सर्व संबंधितांना एकत्र आणलं आणि हे मिशन संपूर्ण भारतासाठी आहे याची जाणीव करून दिली. पुढचं गगनयानचं पहिलं चाचणी उड्डाण असेल, जे ऑक्टोबर महिन्यात होऊ शकतं.’
Jalana Maratha Protest : शरद पवारांच्या ताफ्याला जालन्यात विरोध, नेमकं काय घडलं?
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी या वर्षी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं होतं, ‘पहिलं चाचणी यान मिशन, TV-D1, 2023 मध्ये नियोजित आहे. यानंतर दुसरं चाचणी यान TV-D2 मिशन 2024 च्या पहिल्या तिमाहीत असेल, जे गगनयान (LVM3-G1) चे पहिले मानवरहित मिशन असेल.
हे वाचलं का?
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले होते, ‘रोबोटिक पेलोडसह चाचणी वाहन मिशन (TV-D3 आणि D4) आणि LVM3-G2 मिशनसाठी पुढील योजना तयार करण्यात आली आहे. यशस्वी चाचणी यान आणि क्रू मिशनच्या निकालांवर आधारित, 2024 च्या अखेरीस क्रू मिशन पाठवण्याची योजना आहे.
काय आहे गगनयान मोहीम?
गेल्या वर्षीच केंद्र सरकारने गगनयान मोहिमेसाठी १० हजार कोटी रुपये जारी केले होते. भारताची ही एकमेव अंतराळ मोहीम आहे. गगनयान स्पेस फ्लाइट मिशन अंतर्गत अंतराळवीरांना अंतराळात पाठवलं जाईल. गगनयान मोहिमेअंतर्गत इस्रो अंतराळवीरांना पृथ्वीपासून 400 किमी वर अंतराळात पाठवणार आहे. इस्रोने भारतीय हवाई दलाला या मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड करण्यास सांगितलं होतं.
ADVERTISEMENT
Jalana Maratha Protest : ‘मराठा आंदोलकांना हात लावलात तर…’, ठाकरेंचा सरकारला इशारा
गगनयान मोहीम कशी असेल?
गगनयानच्या प्रक्षेपणात मानवरहित यान रॉकेटच्या माध्यमातून अवकाशात पाठवलं जाणार आहे. सर्व यंत्रणा तपासल्या जातील. रिकव्हरी सिस्टम आणि टीमची तयारी तपासली जाईल. या मोहिमेत भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचाही सहभाग आहे.
ADVERTISEMENT
व्योमित्र रोबोट पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात गगनयानद्वारे पाठवण्यात येणार आहे. ISRO ने 24 जानेवारी 2020 रोजी व्योमित्र महिला ह्युमनॉइड रोबोट सादर केला होता. हा रोबोट बनवण्याचा उद्देश हा आहे की, तो देशाच्या पहिल्या मानवी मिशन गगनयानच्या क्रू मॉड्यूलमध्ये पाठवून अंतराळातील मानवी शरीराच्या हालचाली समजून घेईल. तो सध्या बंगळुरूमध्ये आहे. याला जगातील सर्वोत्कृष्ट स्पेस एक्सप्लोरर ह्युमनॉइड रोबोटचा किताब मिळाला आहे.
व्योमित्र रोबोट मानवाप्रमाणे काम करतो. तो गगनयानच्या क्रू मॉड्युलमध्ये बसवलेलं रीडिंग पॅनेल वाचेल. तो ग्राउंड स्टेशनवर उपस्थित शास्त्रज्ञांशीही बोलत राहणार आहे. या मानवरहित मोहिमेचे जे परिणाम येतील त्यानंतर आणखी एक मानवरहित प्रक्षेपण होईल. तिसऱ्या प्रक्षेपणात भारतीय अंतराळवीरांना अंतराळाच्या प्रवासासाठी पाठवलं जाईल.
Viral : अरे बापरे! प्राण्यांप्रमाणे चार पायावर चालतात ‘ही’ माणसे, काय आहे रहस्य?
सात दिवसांऐवजी गगनयान पृथ्वीभोवती 1 किंवा 3 दिवस फिरेल
इस्रोची पूर्वीची योजना अशी होती की मानवी अंतराळ मोहिमेदरम्यान (पहिली मानवी अंतराळ मोहीम) गगनयान भारतीय अंतराळवीरांना सात दिवस पृथ्वीभोवती पाठवेल. पण आता परिस्थितीनुसार, गगनयान पृथ्वीभोवती फक्त एक ते तीन दिवस फिरण्यासाठी प्रक्षेपित केलं जाईल.
या अभियानात विकास होत आहे. काही वेळा कमतरता देखील आढळतात, त्या दुरुस्त केल्या जातात. या मोहिमेत तीनऐवजी दोन किंवा एकच अंतराळवीर जाण्याची शक्यता आहे. गगनयानचे क्रू मॉड्यूल पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवर असलेल्या लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये कक्षेत पाठवलं जाईल.
हे मिशन असं आहे की त्यात कोणतीही चूक मान्य करता येणार नाही. कारण, त्यात भारतीय हवाई दलाचे सक्षम वैमानिक पाठवले जाणार आहेत. त्यांना पाठवण्यापूर्वी या मिशनच्या अनेक चाचण्या होतील. पुढच्या वर्षी लाँच करण्याची तयारी सुरू आहे पण ती पुढेही जाऊ शकते.
आदित्य L1 लॉन्चिंग
शनिवारी (2 सप्टेंबर) इस्रोने पीएसएलव्ही-सी57/आदित्य-एल1 या पहिल्या सूर्य मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. हे प्रक्षेपण सकाळी 11:50 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून करण्यात आले. हे प्रक्षेपण PSLV-XL रॉकेटने करण्यात आले आहे. या रॉकेटचे हे 25 वे उड्डाण होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT