लग्नानंतर 9 दिवसात पतीची हत्या, MLA बनून वारसा चालवणाऱ्या पूजा पाल कोण? भाजपात...

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

SP MLA Pooja Pal : राजकारणात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशच्या राजकारणाबद्दल (UttarPradesh Politics) बोलायचं झालं तर, शेअर बाजारापेक्षा येथील राजकारणातील समीकरणं अधिक वेगाने चढ-उतार होतात. उत्तर प्रदेशात झालेल्या राज्यसभा निवडणुका हे याचं साधं उदाहरण आहे. उत्तरप्रदेशात 10 जागांवर राज्यसभेची निवडणूक झाली, ज्यामध्ये 11 उमेदवार रिंगणात होते. 

आपल्या 8 व्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी भाजपने (BJP) असे समीकरण तयार केले की, सपाचे अनेक आमदार यावेळी क्रॉस वोटिंग करताना दिसले. यासर्वात सर्वाधिक चर्चा कौशांबीच्या चायल येथील आमदार पूजा पाल यांची झाली.

कोण आहेत पूजा पाल?

भाजपला मतदान करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या सात आमदारांमध्ये पूजा पाल यांचाही समावेश आहे. मतदानानंतर समाजवादी पक्षाच्या (SP) आमदार पूजा पाल या भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पूजा पाल या चायल मतदारसंघातून सपाच्या आमदार आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पूजा पाल यांचे बसपा आमदार पती राजू पाल यांच्या हत्येनंतर त्या राजकारणात आल्या. राजू पाल यांच्या हत्येत अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची नावे आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने ज्या प्रकारे अतिक अहमद यांच्या कुटुंबावर दडपशाही केली, त्याचा प्रभाव पूजा पाल यांच्यावर कोणत्या ना कोणत्या मार्गाने झाला, असे बोलले जात आहे. पतीच्या हत्येचा आरोप अतिक अहमदवर होता. त्यामुळेच पूजा पाल यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असावा, असे मानले जात आहे.

लग्नानंतर 9 दिवसातच पतीची हत्या

आमदार पूजा पाल यांचा विवाह 16 जानेवारी 2005 रोजी बसपा आमदार राजू पाल यांच्याशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या नऊ दिवसातच त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. अतिक अहमदच्या गुंडांनी बसपा आमदार राजू पाल यांची जाहीरपणे गोळ्या झाडून हत्या केली होती. राजू पाल यांच्या मृत्यूपासून पूजा पाल या त्यांचा राजकीय वारसा सांभाळत आहेत. 

ADVERTISEMENT

उमेश पाल हा राजू पाल खून खटल्यातही महत्त्वाचा साक्षीदार होता. गेल्या वर्षी उमेश पाललाही गोळ्या झाडून आणि बॉम्बच्या हल्ल्यात मारलं गेलं. उमेश पालच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले दोन उत्तरप्रदेशचे पोलीस कर्मचारीही यावेळी शहीद झाले.

ADVERTISEMENT

अतिक गँगवर लावण्यात आले होते आरोप

उमेश पालच्या हत्येनंतर काही महिन्यांनी खुनाचा आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या खुनात सहभागी असलेल्या अतिकच्या मुलालाही पोलिसांनी ठार केलं होतं. 2005 मध्ये पती राजू पाल यांच्या हत्येनंतर पूजा पालने नराधमांना शिक्षा व्हावी यासाठी लढा दिला. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी तिने राजकारणातही प्रवेश केला. बसपा आणि सपा असा राजकारणातला प्रवास असणाऱ्या पूजा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT