PSI Somnath zende : Dream11 मुळे निलंबन, PSI झेंडे कसे फसले?; अधिकाऱ्याने सांगितली Inside Story

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

won 1.5 crore on Dream 11, PSI Somnath Zende Suspended after
won 1.5 crore on Dream 11, PSI Somnath Zende Suspended after
social share
google news

-कृष्णा पांचाळ, पिंपरी चिंचवड

ADVERTISEMENT

PSI Somnath zende Latest News in Marathi : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे ड्रीम११ मुळे चौकशीच्या भोवऱ्यात अडकलेत. ड्रीम ११ वर ऑनलाईन गेम खेळताना झेंडे जिंकले आणि त्यांना दीड कोटी रुपये मिळाले. पण, या गेममुळे त्यांचा गेम झालाय. पीएसआय झेंडे यांचे निलंबन झालं आहे. त्यांनी नेमक्या काय चुका केल्या आणि पुढे झेंडे यांच्यासोबत काय होणार याबद्दल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी सविस्तर माहिती दिली. (Why PSI Somnath zende Suspended)

माने म्हणाले, “पिंपरी चिंचवड आयुक्तालयात पीएसआय सोमनाथ झेंडे कार्यरत आहेत. त्यांनी ऑनलाईन गेममध्ये भाग घेतला होता. त्यासंदर्भात त्याची चौकशी चालू होती. चौकशीमध्ये त्यांनी कोणतीही परवानगी न घेता अशा प्रकारच्या गेममध्ये भाग घेतला होता. त्यांना आर्थिक प्राप्ती झाली होती. तसेच पैसे जिंकल्यानंतर त्यांनी वर्दीमध्ये प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या”, असं पोलीस आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी सांगितले.

हे वाचलं का?

झेंडे यांनी कोणत्या नियमांचं केले उल्लंघन?

“शासकीय नोकरीमध्ये असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांचं वर्तन कसं असावं, याबद्दल शासनाने नियमावली ठरवून दिलेली आहे. नियमावलीनुसार अधिकारी कर्मचाऱ्याला खेळात वा कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल, तर त्यांनी पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे”, अशी माहिती माने यांनी दिली.

हेही वाचा >> Lalit Patil : एक कॉल अन् ललित पाटीलचा झाला ‘गेम’; मुंबई पोलिसांनी कसं पकडलं?

“माध्यमांना माहिती देतानाची माहिती सुद्धा द्यायला हवी. पण, त्यांनी परवानगी न घेता अशा ऑनलाईन गेममध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या. त्यामुळे पोलीस खात्याबद्दल उलट प्रतिक्रिया येत होत्या. हे एकप्रकारे पोलीस खात्याला तडा जाण्यासारखंच कृत्य होतं. हे सगळं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं आहे”, अशी माहिती माने यांनी दिली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘…तर शरद पवारांनाही हा प्रश्न विचारला असता”, राहुल गांधींनी मांडली रोखठोक भूमिका

“विनापरवानगी ऑनलाईन गेममध्ये भाग घेणं, विनापरवानगी प्रसारमाध्यमांना गणवेशात मुलाखत देणे हे प्रमुख मुद्दे होते”, असे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी सांगितले.

PSI Somnath Zende : पीएसआय झेंडेविरुद्ध पुढे काय होणार?

“प्राथमिक चौकशीत लावण्यात आलेले आरोप दिसून आले, तर त्याची विभागीय चौकशी केली जाते. न्यायालयात जशी सुनावणी होते, तशी ही सुनावणी असते. न्यायालयात वकिलामार्फत बाजू मांडली जाते, पण विभागीय चौकशीत पक्षकाराला मित्रअधिकाऱ्यामार्फत बाजू मांडता येते. तज्ज्ञ अधिकाऱ्याला सोबत घेता येते. बाजू ऐकून घेतल्यानंतर संबंधित अधिकारी रिपोर्ट पाठवतात. त्यानंतर शिक्षेविषयी निर्णय घेतला जातो”, माने यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT