Nitin Deshmukh : अधिवेशन सुरु असतानाच ठाकरे गटाच्या आमदारावर गुन्हा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार नितीन देशमुख यांच्याविरुद्ध पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला...
police registered fir against mla nitin deshmukh
police registered fir against mla nitin deshmukhMumbai Tak

ठाकरे गटाचे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्याविरुद्ध ऐन हिवाळी अधिवेशनदरम्यान गुन्हा दाखल झालाय. नागपूरमधील रवी भवन परिसरात झालेल्या घटनेप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आमदार नितीन देशमुख यांच्यावर पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आलेला आहे.

हिवाळी अधिवेशन सुरू असताना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख वादात अडकले आहेत. समर्थकांसह पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आमदार नितीन देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय.

नितीन देशमुख यांच्यावर नेमके काय आरोप करण्यात आले आहेत?

पोलीस उपनिरीक्षक सखाराम कांबळे यांनी नितीन देखमुख यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. हिवाळी अधिवेशनामुळे रवि भवन येथे येणाऱ्या गाड्यांना आणि व्यक्तींना पासेस तपासून आणि तयार करून प्रवेश देण्याचे देण्याचं काम आहे.

ही घटना घडली, त्यावेळी सखाराम कांबळे यांच्यासह पोलीस निरीक्षक शरद कदम आणि एसआरपीएफचे कर्चमारी व पोलीस कर्मचारीही होते. रवि भवन मुख्य प्रवेश द्वारावर गाड्यांचे पासेस चेक करून प्रवेश दिला जातो. त्यावरूनच नितीन देशमुखांनी वाद केल्याचं पोलीस अधिकाऱ्याचं म्हणणं आहे.

सखाराम कांबळे यांच्या तक्रारीनुसार "27 डिसेंबर 2022 रोजी 6.10 वाजता एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हामधून एक व्यक्ती (नितीन देशमुख) आली. यावेळी त्यांच्यासोबत पाच ते सहा व्यक्तीही होते. त्यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षक कदम यांना विचारणा केली की, लोकांना का अडवता?"

"कदम यांनी सुरक्षिततेच्या कारणामुळे प्रत्येक व्यक्तीला पास देऊन प्रवेश देत असल्याचं सांगितलं. त्यावेळी त्या व्यक्तीने (नितीन देशमुख) कदम यांच्या शर्टावर लावलेला बिल्ला दाखवत, हा बिल्ला कशाचा आहे? तुम्ही मला ओळखता का? असं म्हटलं. त्यानंतर एका व्यक्तीने "तू पीआय कोणाशी बोलतोस माहितीये का?," असं तक्रारीत म्हटलेलं आहे.

"मी त्यांना सांगितलं की, ते पोलीस निरीक्षक आहेत आणि अर्वाच्य भाषा वापरू नका. त्यानंतर ते लोक आक्रमक झाले आणि 'हरामखोरानों तुमची काय लायकी आहे मला माहिती आहे. चांगल्या ठिकाणी बदल्या करण्यासाठी तुम्ही पोलीस वाले आमच्या आमदारांच्या पाया पडता,' म्हणत ती व्यक्ती (नितीन देशमुख) धक्का देऊन जबरदस्तीने काही लोकांना विना पास घेऊन रवि भवनमध्ये गेले," असं तक्रारीत म्हटलं आहे.

जाताना "मी बाळापूर विधानसभा क्षेत्राचा आमदार नितीन देशमुख आहे, तुला व तुझ्या पीआयला उद्या पाहून घेतो,' असं म्हणून मला धक्का देऊन माझ्या कामात अडथळा निर्माण करून जबरदस्तीने रवि भवनात प्रवेश केला. त्यामुळे नितीन देशमुख आणि त्यांच्या साथीरादारांविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी, असं सखाराम कांबळे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in