‘शाहरुख खान, स्टॅलिन यांना गोळ्या घालणाऱ्यांना 25 कोटी’, जगद्गुरु परमहंस आचार्य कोण?
उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातनबद्दल केलेल्या टिप्पणीवर परमहंस आचार्य यांनी उदयनिधींचा शिरच्छेद करणाऱ्याला 10 कोटींचे बक्षीस देऊ असे सांगितले होते.
ADVERTISEMENT

Paramhans Acharya: देशात मुद्दा राजकारणाचा असो की, चित्रपटांचा त्यावर अयोध्येचे जगद्गुरु परमहंस आचार्य (Paramhans Acharya) आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी ते शाहरुख खानवर (Shaharukh khan) वादग्रस्त वक्तव्य करतात. तर कधी उदयनिधी स्टॅलिनला (Stalin) धमकी देतात. मात्र आता त्यांच्या निशाणावर आले आहेत, समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) नेते स्वामी प्रसाद मौर्य.(Swami Prasad Maurya) त्यानी म्हटले आहे की, जो कोणीही स्वामी प्रसाद मौर्यला गोळी मारेल त्याला 25 कोटीचे बक्षीस दिले जाईल. या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे परमहंस आचार्यांवर टीकाही केली जात आहे.
मध्य प्रदेश ते उत्तर प्रदेश
या सर्व प्रकारामुळेच आता लोकांना प्रश्न पडला आहे की जगतगुरु परमहंस आचार्य नेमके कोण आहेत. ते मध्य प्रदेशातून थेट उत्तर प्रदेशातील अयोध्येत कसे पोहचले. त्याचबरोबर अशी वादग्रस्त वक्तव्य त्यांच्याकडून का केली जातात. आणि त्या पुढचं त्यांचे नेमकं आयोजन काय असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
महंतपदाची गादीही मिळाली
परमहंस आचार्य यांना अनेक प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितले की, आता या क्षणी मी अयोध्येतील तपस्वी छावणीचा पीठाधीश्वर आहे. रामघाटाजवळ आमचा आश्रम आहे. ते सांगतात की, मी मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील आहे. मी लहानपासूनच संन्यासी जगत आलो आहे. संन्यास घेतल्यानंतर मी अनेक तिर्थक्षेत्रांना भेटीगाठी दिल्या. तर प्रारंभी अयोध्या, वृंदावन आणि काशी या ठिकाणी राहिलो आहे. ऋषिकेशमध्ये स्वामी रामसुख दास यांच्या आश्रमातही राहिलो आहे. हिमालयातही खूप भटकलो आहे. त्यानंतर 2017 मध्ये तपस्वी छावणीचे गुरुदेव सर्वेश्वर दास यांच्याकडून दीक्षा घेतली आणि त्याचवर्षी मला छावणीच्या महंतपदाची गादीही मिळाली असल्याचे ते सांगतात.
हे ही वाचा >> MLA Disqualification : ‘शेवटची संधी देतोय’, सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांवर संतापले
धर्मासाठी सत्य बोलणे
तुम्ही अशी वादग्रस्त वक्तव्य का करता, त्याच्या पाठीमागची कारणं काय या प्रश्नावर ते म्हणतात की, मग ते लोक दुसऱ्या धर्मावर का टीका करत नाहीत. त्यावर का बोलत नाहीत एकही शब्द. कारण त्यांना माहिती आहे की, त्यावर बोलले तर आपला जीव जाऊ शकतो. मात्र सध्या सनातनवर टीका करणं ही फॅशन झाले. त्यामुळे कोणीही येतो आणि आमच्या धर्मावर टीका करतो आणि निघून जातो. याकडे पहिल्यांदा मी दुर्लक्ष केले, मात्र आता त्यावर प्रतिक्रिया देणे मला योग्य वाटू लागले आहे. आणि तेही त्यांच्याच भाषेत मी उत्तर देऊ लागलो. त्यातच मी या विरोधात आवाज उठवला नाही तर मी मग माझा जिवंत राहून उपयोग काय असा प्रतिसवालही ते करतात. प्रसिद्धीसाठी माध्यमांमधून चर्चेत राहणे हा मुद्दा नाही तर धर्मासाठी सत्य बोलणे हा त्यापाठीमागचा उद्देश्य असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.