14 देश 28 गँगस्टर; भारताने तयार केली वॉन्टेड आरोपींची यादी; गोल्डी ब्रारचाही समावेश
Wanted gangster list : केंद्र सरकारने वॉन्टेड गुंडांची यादी तयार केली आहे. या यादीत 28 गुंड आहेत. हे ते गुंड आहेत जे भारताबाहेर इतर देशांमध्ये लपून बसले आहेत. सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या 28 पैकी नऊ गुंड कॅनडात आणि पाच अमेरिकेत बसले आहेत. या गुंडांवर खून, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. (14 countries […]
ADVERTISEMENT

Wanted gangster list : केंद्र सरकारने वॉन्टेड गुंडांची यादी तयार केली आहे. या यादीत 28 गुंड आहेत. हे ते गुंड आहेत जे भारताबाहेर इतर देशांमध्ये लपून बसले आहेत. सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या 28 पैकी नऊ गुंड कॅनडात आणि पाच अमेरिकेत बसले आहेत. या गुंडांवर खून, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. (14 countries 28 gangsters; List of wanted accused prepared by India; Including Goldie Brar)
sidhu moose wala murder : हत्येनंतर शूटर्सनी केलं होतं सेलिब्रेशन; तपासातून महत्त्वाची माहिती समोर
या यादीत सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार यांचेही नाव आहे. गोल्डी ब्रार हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाईंड मानला जातो. गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य आहे. गेल्या वर्षी २९ मे रोजी सिद्धू मुसेवाला यांची हत्या झाली होती. या यादीत अनमोल बिश्नोई उर्फ भानूचेही मोठे नाव आहे. तो अमेरिकेत लपून बसल्याचा संशय आहे. भानूवर दहशतवादी हल्ले तसेच फिल्म आणि कॉर्पोरेट जगताशी संबंधित लोकांच्या टार्गेट किलिंगचा आरोप आहे.
सलमानच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोईने घेतली होती ४ लाखांची रायफल, मग कट का फसला?