आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात क्लीन चीट, ‘एनसीबी म्हणाली, पुरेसे पुरावेच नाहीत’

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कॉर्डेलिया क्रूझवर आढळेल्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आर्यन खानला क्लीन चीट मिळाली आहे.

मुंबई आणि देशातील बहुचर्चित क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्लीन चीट मिळाली आहे. एनसीबीने एक निवेदन प्रसिद्ध करून याची माहिती दिली आहे.

एनसीबी म्हणजेच अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने शुक्रवारी एनपीडीस न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात आर्यन खान यांच्या नावाचा समावेश नाही. एनसीबीने सहा आरोपींना आरोपी न करण्याच्या कारणाचाही खुलासा केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आरोपपत्रात मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना क्लीन चीट मिळालेली नाही. दोघांनाही ड्रग्ज केस प्रकरणात आरोपी ठरवण्यात आलेलं आहे. एनसीबीला ६ जणांविरुद्ध कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.

ADVERTISEMENT

एनसीबीला ज्यांच्याविरोधात पुरावे मिळाले नाहीत, त्यांच्यात आर्यन खानसह समीर सेहगल, भास्कर अरोरा, गोपाल जी. आनंद, अविन साहू, मानव सिंघल यांचा समावेश आहे. इतर १४ लोकांविरुद्ध क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आता १४ जणांविरुद्ध खटला चालवला जाणार आहे.

ADVERTISEMENT

6 हजार पानांचं आरोपपत्र

एनसीबीने ९० दिवसांचा वेळ वाढवून देण्याची मागणी केल्यानंतर ३१ मार्च रोजी एनपीडीएस न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी एनसीबीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांचा अवधी वाढवून दिला होता. त्यानंतर एनसीबीने आज आरोपपत्र दाखल केलं. एनसीबीने स्पायरल बाईडिंग केलेल्या दहा खंडामध्ये हे आरोपपत्र तयार केलेलं असून, ते तब्बल सहा हजार पानांचं आहे.

२ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझ वर धाड टाकली होती. यावेळी एनसीबीच्या पथकाने क्रूझवरून आर्यन खानसह ८ लोकांना अटक केली होती. एनसीबीने अटक केलेले आरोपी वेगवेगळ्या वेळी जामीनावर बाहेर आले आहेत. तर यातील एक आरोपी अजूनही तुरूंगात आहे.

याच प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यावरून बराच मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणामुळे एनसीबीचे तत्कालिन विभागीय संचालक, प्रभाकर साईल मनिष भानुशाली यांची नावं गाजली होती.

या प्रकरणात एनसीबीच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. विशेषतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी थेट समीर वानखेडे यांनाच वारंवार लक्ष्य केलं होतं. त्यानंतर एनसीबीने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली होती. एनसीबीच्या एसआयटीनेच आता आर्यन खानसह सहा जणांविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्यानं गुन्हे दाखल केले नसल्याचं म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT