चंद्रपूर: नववीतील विद्यार्थिनी गर्भवती, गावातील 19 वर्षाच्या तरूणाकडूनच..
Chandrapur 15-year-old girl Pregnant: चंद्रपूर: महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये (Chandrapur) एक नववीच्या वर्गात शिकणारी 15 वर्षीय मुलगी गर्भवती (Pregnant) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या पोटात दुखू लागल्याने आईने आपल्या मुलीला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जी गोष्ट सांगितली त्यानंतर मुलीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तपासणीनंतर मुलगी गर्भवती असल्याचं समोर आलं. ही […]
ADVERTISEMENT

Chandrapur 15-year-old girl Pregnant: चंद्रपूर: महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये (Chandrapur) एक नववीच्या वर्गात शिकणारी 15 वर्षीय मुलगी गर्भवती (Pregnant) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या पोटात दुखू लागल्याने आईने आपल्या मुलीला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जी गोष्ट सांगितली त्यानंतर मुलीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तपासणीनंतर मुलगी गर्भवती असल्याचं समोर आलं. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील आहे. ग्रामीण भागातील हा प्रकार विचार करायला लावणारा आहे. (chandrapur 9th class girl pregnant raped by 19 year old youth)
पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलीच्या पोटात दुखू लागल्याने मुलीच्या आईने तिला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता तेथे उपस्थित असलेले डॉ. अचल मेश्राम यांनी मुलीची तपासणी केली. तपासणीनंतर त्यांना सुद्धा काहीसा धक्का बसला. कारण संबंधित मुलगी ही गरोदर होती. जेव्हा डॉक्टरांनी ही बाब मुलीच्या आईला सांगितली तेव्हा तिचेही भान हरपले.
त्यानंतर या घटनेची माहिती डॉ. अचल मेश्राम यांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात दिली. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांमध्येही खळबळ उडाली. सुरुवातीला पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर गावातीलच 19 वर्षीय लोकेश चुद्री या तरूणाला अटक केलं आणि त्यांच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.
दरम्यान, ग्रामीण भागातून अशा घटना समोर येत असल्याने आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आजकाल लहान मूल असो वा प्रौढ, प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो आणि मोबाइलमध्ये इंटरनेट सुद्धा असतं. मुलं काय पाहत आहे हे त्यामुळे कोणालाही कळत नाही. मोबाइलवर मुलं काय पाहतात याकडे पालकांनी अधिक काटेकोरपणे लक्ष ठेवणं गरजेचं झालं आहे. कारण मोबाइलच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ किंवा तत्सम सामुग्री ही सहजपणे उपलब्ध होतात. अशावेळी नकळत्या वयात पौगंडावस्थेतील मुला-मुलींकडून आकर्षणापायी काही चुका घडतात. ज्याचे त्यांना आयुष्यभर परिणाम भोगावे लागतात.