पती-पत्नी और वो! Boss च्या पत्नीला कळलं आणि जीवच गेला; 5 जणांनी काय केलं?
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात पत्नीने भावाच्या मदतीने पतीच्या गर्लफ्रेंडची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT

Extra Marital affairs Crime : 21 वर्षांची तरुणी. काम करत असताना बॉसचा तिच्यावर आणि तिचा बॉसवर जीव जडला. दोघांमध्ये नंतर शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. बॉससोबत तरुणीचं नाते मात्र लपून राहिले नाही. बॉसच्या पत्नीपर्यंत हे प्रकरण गेले आणि तरुणीला कायमचा जीव गमवावा लागला. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केलीये.
ही घटना आहे उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील. ‘पती-पत्नी और वो’ असं हे प्रकरण आहे. हे घडलंय गाझियाबादमधील मुरादनगर पोलीस स्टेशन हद्दीत. झालं असं की, 21 वर्षीय तरुणी रागिणीचे बंटी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. बंटी हा रागिणीचा बॉस होता.
दोघेही नोएडामध्ये एकत्र प्रॉपर्टी डिलिंगचे काम करायचे. या दोघांमध्ये बरेच दिवस प्रेमप्रकरण सुरू होते. याबद्दल बंटीच्या पत्नीलाही कळले होते. त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे तरुणाची पत्नी खूप नाराज असायची. पण बंटी रागिणीला सोडायला तयारच नव्हता.
राखीने भावाची घेतली मदत
पत्नी राखीने पती बंटीला हे सोडून देण्यास सांगितले. समजूतीनंतरही बंटीने त्याची गर्लफ्रेंड रागिणीला भेटणे थांबवले नाही. दोघांमधील प्रेमप्रकरणामुळे राखी आणि बंटी यांच्यात दुरावा येण्यास सुरुवात झाली.