Loan Fraud: Videocon चे वेणुगोपाल धूत यांनाही अटक, कोचरांचा पाय खोलात

मुंबई तक

Videocon owner Venugopal Dhoot arrested: मुंबई: बँक कर्ज फसवणूक प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने (CBI) मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी सीबीआयने व्हिडिओकॉनचे (Videocon) मालक वेणुगोपाल धूत (Venugopal Dhoot) यांना अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणी सीबीआयने ICICI बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर (Chanda Kochar) आणि त्यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochar) यांना अटक केली होती. (loan […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Videocon owner Venugopal Dhoot arrested: मुंबई: बँक कर्ज फसवणूक प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने (CBI) मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी सीबीआयने व्हिडिओकॉनचे (Videocon) मालक वेणुगोपाल धूत (Venugopal Dhoot) यांना अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणी सीबीआयने ICICI बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर (Chanda Kochar) आणि त्यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochar) यांना अटक केली होती. (loan fraud case after chanda kochhar videocon owner venugopal dhoot arrested)

चंदा कोचर ICICI बँकेच्या प्रमुख असताना त्यांनी व्हिडिओकॉन समूहाला बेकायदेशीरपणे कर्ज दिले असा आरोप आहे. या बदल्यात चंदा यांचे पती दीपक कोचर यांच्या न्यू रिन्यूएबल कंपनीला व्हिडिओकॉनकडून गुंतवणूक मिळाली होती. व्हिडिओकॉन ग्रुपला 3,250 कोटी रुपयांचे बँक कर्ज दिल्याप्रकरणी सीबीआयने गेल्या आठवड्यात ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे दीपक कोचर यांना अटक केली होती. यानंतर मुंबईतील विशेष न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

2012 मध्ये व्हिडिओकॉन ग्रुपला ICICI बँकेने कर्ज दिले होते. या प्रचंड मोठ्या कर्जाची 85 टक्के रक्कम व्हिडिओकॉनने फेडलीच नाही. त्यामुळे हे कर्ज नंतर एनपीए करण्यात आलं. त्यालाच ‘बँक फ्रॉड’ असे म्हटले आहे. सप्टेंबर 2020 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दीपक कोचरला अटक केली होती. खरं तर, 2012 मध्ये चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखालील ICICI बँकेने व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटींचे कर्ज दिले होते. ज्यानंतर सहा महिन्यांनी वेणुगोपाल धूत यांच्या मालकीच्या मेसर्स सुप्रीम एनर्जीने मेसर्स न्यूपॉवर रिन्यूएबल्सला 64 कोटींचे कर्ज दिले होते. ज्यामध्ये दीपक कोचर यांचा 50% हिस्सा आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp