
पालघरमध्ये दहावीचा निकाल लागण्याआधीच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. १६ वर्षांच्या या मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पालघर जिल्ह्यातील जव्हार या ठिकाणी ही घटना घडली आहे. दहावीची परीक्षा दिलेली ही विद्यार्थिनी बेपत्ता होती.
जव्हार तालुक्यातील वडपाडा या ठिकाणी ही मुलगी राहात होती. या बेपत्ता मुलीचा मृतदेह तांबडपाडा या भागात आढळून आला. तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. हत्येआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. या मुलीने दहावीची परीक्षा दिली होती. निकाल लागण्याच्या आधी तिची हत्या करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या मुलीच्या शवविच्छेदनाचा अहवाल अजूनही प्रतीक्षेत आहे . पीडित विद्यार्थिनी ही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. दहावीच्या परीक्षेत ती 67% गुण मिळवत पास झाली . मात्र निकाल बघण्याआधीच तिची निर्घृण हत्या करण्यात आली . या घटनेबाबत भादवि कलम 302 , 301 , 341 नुसार जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे . तसंच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत .
जव्हारजवळच्या वडपाडा गावात ही अल्पवयीन मुलगी शिकत होती. तिची आई एके ठिकाणी कामावर जात होती. मात्र दोन दिवस या मुलीची आई कामावर जाऊ शकली नाही. त्यामुळे या मुलीला आपल्याऐवजी जायला सांगितलं.
१४ जूनला ही मुलगी तिच्या आईऐवजी कामावर गेली. त्यानंतर ती शेतीचं काम करण्यासाठी गेली, मात्र घरी परतलीच नाही. त्यानंतर तिच्या घरातल्यांनी तिचा शोध सुरू केला. या मुलीचा मृतदेह आढळला आहे. तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.